एकीकडे बंदीची मागणी तर, दुसरीकडे OTT वर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज; इथे पाहता येणार ‘द केरळ स्टोरी’ सिनेमा…

नवी दिल्ली – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात चार महिलांचे मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते, असे दाखवण्यात आले आहे. यावरून अनेकांनी या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. मात्र एकीकडे या चित्रपटाला काही जण विरोध करत आहेत. तर दुसरीकडे या चित्रपटाला काही प्रेक्षकांचा आणि राजकीय नेत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, द केरळ स्टोरी या चित्रपटाने पहिल्या दिवशी बाॅक्स ऑफिसवर 8.3 कोटींचे कलेक्शन केले. दुसऱ्या दिवशी 11.22 कोटींचे कलेक्शन केले आणि तिसऱ्या दिवशी 16.60 कोटींचे कलेक्शन केले. विशेष म्हणजे सोशल मीडियावर लोक पोस्ट शेअर करत द केरळ स्टोरी या चित्रपटाला सपोर्ट करताना दिसत आहेत. लोक द कश्मीर फाईल्स आणि द केरळ स्टोरी या चित्रपटांची तुलना का करत आहेत.
चित्रपट प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहे. त्यामुळे, त्याच्या OTT प्रीमियरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. तरी या चित्रपटाची OTT प्रीमियरची तारीख सध्या माहीत नाही. तरी देखील हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर दिड महिन्यांनंतर ओटीटीवर प्रदर्शित होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
त्यानुसार हा चित्रपट साधारण जूनच्या तिसऱ्या आठवड्यात तुम्हाला पाहता येवु शकेल असा अंदाज आहे. चित्रपटाचे स्ट्रीमिंग अधिकार ZEE5 ने आणले आहेत, अशी माहिती समोर आली आहे आणि एकदा तो स्ट्रीमिंगसाठी तयार झाल्यावर तो प्लॅटफॉर्मवर पाहिला जाऊ शकतो. असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांमध्ये हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला येणार आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक नवीन विक्रम तयार करत असल्याचं दिसत आहे.





