जयंतीच्या दिवशी फुलेंच महत्व कमी करायचं, त्यांच्या पूर्वजांच…; ओबीसी नेत्याने व्यक्त केला संताप

Udayaraje Bhosale | आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती असल्याने अनेक नेते मंडळींनी फुले वाड्यात जात फुले दाम्पत्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजप नेते उदयराजे भोसले यांनी देखील हजेरी लावली होती. त्यांनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. मात्र, उदयराजे यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती, असे विधान उदयराजे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी आक्षेप घेतला आहे.
महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे. उदयनराजे यांचं वक्तव्य तीन- चार वेळेस ऐकलं. महात्मा फुलेंच महत्व कळल्याने उदयन राजे हे फुले वाड्यावर आलेत अस वाटलं. इथं येऊन जयंतीच्या दिवशी फुलेंच महत्व कमी करायचं. त्यांच्या पूर्वजांच महत्व वाढवलय, असे ससाणे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. संभाजी महाराज यांनी म्हटलं वाघ्या कुत्रा कसा आला? त्यांनी यावर हरकत घेतली. यांना औरंगजेब नको, वाघ्या कुत्रा नकोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आत्तापर्यंतचे संशोधक, इतिहास तज्ञ फेल ठरलेत, आणि उदयन राजे यांनी जे वक्तव्य केलय. प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली. शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचं काय झालं? परत शाळा का सुरू राहिली नाही? त्यानंतरच्या वंशजांनी आणि उदयन राजे यांनी सुद्धा शैक्षणिक वारसा पुढे का घेऊन गेला नाहीत? असे प्रश्न देखील मंगेश ससाणे यांनी उपस्थित केले आहेत.





