राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने मतदार नाव नोंदणी कॅम्प आयोजित करण्याबाबत तहसिलदारांना निवेदन

शिरूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पक्षाचा वतीने शिरुर निवडणूक नायब तहसीलदार यांना मतदार नाव नोंदणी कॅम्प आयोजित करण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले आहे. रा.कॉ.शरदचंद्र पवार गटाच्या वतीने शिरूर शहरातील व पंचक्रोशितील नागरीकांचे छायाचित्रासह मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त,पूर्नेरिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन मतदार नाव नोंदणी,दुरुस्ती,नावे कमी करणे हा कार्यक्रम २४ जुलै पर्यंत असून शिरूर शहर व पंचक्रोशीतील मतदारांना लाभ घेण्याकरता शिरूर शहर जुनी नगरपालिका हॉल व हुडको येथील सांस्कृतिक भवन,शिरूर येथे मतदार नाव नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्याकामी लेखी निवेदन निवडणुक नायब तहसीलदार सुजाता बाराथे यांना देण्यात आले आहे.
यावेळी रा.काँ.शरदचंद्र पवार पक्ष ज्येष्ठ नागरिक उपाध्यक्ष -सुरेश पाचर्णे,रामलिंग महिला पतसंस्था चेअरमन राणी कर्डिले,रा. काँ. शरदचंद्र पवार पक्ष महिला शिरूर शहर अध्यक्षा डॉ. स्मिता कवाद,युवती शहर अध्यक्ष गीता आढाव,युवती जिल्हा उपाध्यक्ष प्रियंका धोत्रे,गायत्री भोराडे ,कल्पना चांदगुडे,सागर नरवडे,आदित्य उबाळे,अक्षय सोनवणे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.





