“…तर इंडिया अलायन्स बंद करा” ; ममता, अखिलेश यादवनंतर ‘या’ नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

Omar Abdullah on India Block । गेल्या काही काळापासून, विरोधी आघाडी ‘इंडिया ब्लॉक’च्या नेत्यांमधील मतभेद हे चव्हाट्यावर आले आहेत. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यानंतर आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील इंडिया ब्लॉकच्या भविष्याबाबत मोठे विधान केले आहे.
ओमर अब्दुल्ला यांनी अंतर्गत कलहानंतर उघडपणाने आपली भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना ओमर अब्दुल्ला यांनी, “इंडिया ब्लॉकची कोणतीही बैठक होत नाही हे दुर्दैवी आहे. त्याचा नेता कोण असेल? अजेंडा काय असेल? युती कशी पुढे जाईल? यावर कोणतीही चर्चा नाही. आपण एकजूट राहू की नाही याबद्दल आता स्पष्टता नाही.” असे म्हणत त्यांनी सर्वपक्षांच्या नेत्यांना धारेवर धरले आहे.
…तर इंडिया अलायन्स बंद करा Omar Abdullah on India Block ।
दिल्ली निवडणुकीनंतर युतीची बैठक झाली पाहिजे, अशी मागणी देखील अब्दुल्ला यांनी केली आहे. सर्वांमध्ये स्पष्टता असायला हवी. जर युती फक्त लोकसभेपर्यंतच होती तर इंडिया अलायन्स बंद करा. पण जर आपल्याला ते विधानसभेत ठेवायचे असेल तर युतीने एकत्र काम केले पाहिजे.असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.
यापूर्वी, इंडिया ब्लॉकच्या विभाजनाच्या प्रश्नावर, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले होते की इंडिया ब्लॉक लोकसभेसाठी आहे हे आधीच ठरलेले आहे. जर आपण बिहारबद्दल बोललो तर इथे आपण सुरुवातीपासून एकत्र होतो. दिल्ली विधानसभा निवडणूक आरजेडी लढवण्याच्या शक्यतेबाबत ते म्हणाले होते की, आमच्या पक्षाने दिल्लीत निवडणूक लढवायची की नाही हे अद्याप ठरवलेले नाही.
#WATCH | Jammu: J&K CM Omar Abdullah says, “… I cannot say anything about what’s going on in Delhi because we have nothing to do with Delhi Elections… As far as I remember, there was no time limit to the INDIA alliance. Unfortunately, no INDIA alliance meeting is being… pic.twitter.com/u9w9FazeJG
— ANI (@ANI) January 9, 2025
अखिलेश यादव यांच्या विधानामुळे खळबळ Omar Abdullah on India Block ।
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी यापूर्वी म्हटले होते की, आम्ही दिल्लीतील लोकांविरुद्ध भेदभाव पाहिला आहे. मी अरविंद केजरीवालजींचे अभिनंदन करतो की हे सर्व असूनही त्यांचे धाडस कमी झालेले नाही. मला पूर्ण विश्वास आहे की माता आणि बहिणी दिल्लीच्या मुलाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी देतील. मी तुम्हाला खात्री देतो की समाजवादी पक्ष पूर्ण जबाबदारीने तुमच्यासोबत उभा आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला पाठिंबा आणि मदतीची आवश्यकता असेल तेव्हा आम्ही तुमच्यासाठी हजर राहू. कारण दिल्ली जितकी तुमची आहे आणि आप सरकारने तुमच्यासाठी काम केले आहे तितकेच आम्हालाही तेच वाटते.
त्याच वेळी, विरोधी आघाडीचा भाग असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षानेही दिल्लीत आम आदमी पक्षाच्या विजयाची आशा व्यक्त केली आहे. काँग्रेस दिल्लीतही निवडणूक लढवत आहे, परंतु तृणमूल काँग्रेसला राष्ट्रीय राजधानीत भाजपला आव्हान देण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत टीएमसी नेते कुणाल घोष म्हणाले होते की, आम आदमी पक्षाचे सरकार पुन्हा येईल आणि भाजपचा पराभव होईल अशी आम्हाला आशा आहे. दिल्लीतील जनता भाजपला पराभूत करेल. असा विसावास त्यांनी यावेळी व्यक्त केला होता.





