Omar Abdullah Marriage : मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी गुपचूप उरकलं लग्न; काय करते पत्नी? आज दिल्लीत रिसेप्शन
Omar Abdullah : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पत्रकार निधी राजदान यांच्या विवाहाची चर्चा आहे. दिल्लीत आज रिसेप्शन होणार असल्याचे वृत्त आहे.

Omar Abdullah Marriage : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला (वय 56) यांनी प्रसिद्ध पत्रकार निधी राजदान (वय 49) यांच्यासोबत विवाह केल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. या विवाहामुळे दोघांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे वृत्त आहे. ओमर अब्दुल्ला यांनी विवाह सोहळ्यातील काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
या विवाहानिमित्त दिल्लीत आज रिसेप्शन आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे. दिल्लीतील पृथ्वीराज रोडवरील जम्मू-काश्मीर हाऊसमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील काही मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण असल्याचे सांगितले जात आहे.
A new journey began yesterday 💍@Nidhi https://t.co/BXbdLq2d1H
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 31, 2026
ओमर अब्दुल्ला आणि निधी राजदान यांचा हा दुसरा विवाह आहे. ओमर अब्दुल्ला यांचे यापूर्वी पायल नाथ यांच्याशी लग्न झाले होते. दोघे काही वर्षांपासून वेगळे राहत होते. 31 जुलै 2026 रोजी त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे वृत्त आहे.
निधी राजदान या प्रसिद्ध पत्रकार असून त्यांनी दीर्घकाळ पत्रकारिता क्षेत्रात काम केले आहे. त्यांचे यापूर्वी पत्रकार निलेश मिश्रा यांच्याशी लग्न झाले होते. मात्र, 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.




