Tokyo Olympics : स्वातंत्र्यदिनी होणार ऑलिम्पिकपटूंचा सत्कार
Updated On:

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर एका खास सोहळ्यात टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार होणार आहे.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे तब्बल 127 खेळाडू सहभागी झाले होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू उपस्थित राहणार असून, त्यानंतर पंतप्रधानांच्या घरी या खेळाडूंना निमंत्रित करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठा संघ सहभागी झाला होता.
त्यात 127 खेळाडूंसह सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक व सदस्य असे एकूण 228 जणांचे पथक टोकियोला रवाना झाले होते.





