ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत वाढ; फेब्रुवारी महिन्यात 25,000 इलेक्ट्रिक वाहने विकली
Updated On:

Ola Electric sales – ओला इलेक्ट्रिक या कंपन्याने शुक्रवारी जारी केलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्यात या कंपनीची 25,000 इलेक्ट्रिक वाहने विकली गेली. या कंपनीने असाही दावा केला आहेकी, एकूण इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेमध्ये या कंपनीचा वाटा 28% इतका झाला आहे. कंपनीने देशभरात 4,000 स्टोअर उभारली आहेत. त्यामुळे या वाहनांची विक्री वाढण्यास मदत होत आहे.
आता शहराबरोबरच ग्रामीण भागातूनही आमच्या वाहनांना मागणी येत असल्याचे या कंपनीचे म्हणणे आहे. स्कूटरबरोबरच आता या कंपनीने इलेक्ट्रिक मोटरसायकल ग्राहकांना उपलब्ध केल्या असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढणार असल्यामुळे आम्ही उत्पादन क्षमतेवर भर दिला असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.





