Oily Skin Tips: उन्हाळा सुरू झाला की अनेकांना त्वचेच्या समस्या वाढू लागतात, विशेषतः ऑयली स्किन असणाऱ्यांना. उकाडा, घाम आणि वाढलेली आर्द्रता यामुळे त्वचेमधील तेलग्रंथी जास्त सक्रिय होतात. यामुळे त्वचेवर सीबम (नैसर्गिक तेल) अधिक प्रमाणात तयार होते आणि चेहरा तेलकट दिसू लागतो. यामुळे फक्त लुक खराब होत नाही, तर मुरुम, बंद रोमछिद्रे आणि मेकअप लवकर खराब होणे अशा समस्या देखील निर्माण होतात. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात तापमान वाढल्याने त्वचेतील तेलनिर्मिती वाढते. हे अतिरिक्त तेल, घाम आणि धूळ यांच्यासोबत मिसळून त्वचेचे पोर्स ब्लॉक करतात. त्यामुळे त्वचा अधिक तेलकट दिसते आणि त्वचेच्या समस्या वाढतात. Oily Skin Tips ऑयली स्किनपासून पूर्णपणे सुटका होणं शक्य नसले, तरी योग्य काळजी घेतल्यास हा त्रास नक्कीच कमी करता येतो. त्यासाठी काही सोपे उपाय खूप उपयोगी ठरतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चेहरा खूप वेळा धुणं टाळा. अनेकांना वाटतं की वारंवार चेहरा धुतल्याने तेल कमी होतं, पण प्रत्यक्षात यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचा त्याची भरपाई करण्यासाठी अधिक तेल तयार करते. त्यामुळे दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुणं योग्य ठरतं. Oily Skin Tips Oily Skin Tips: ऑयली स्किनचा त्रास? या सोप्या टिप्सने मिळवा फ्रेश, चमकदार आणि तरुण त्वचा! ऑयली स्किनसाठी जेल-बेस्ड क्लींजर वापरणं फायदेशीर ठरतं. सॅलिसिलिक अॅसिड किंवा टी ट्री ऑइल असलेले क्लींजर त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करतात आणि पोर्स स्वच्छ ठेवतात. यामुळे त्वचा फ्रेश आणि हलकी वाटते. (Oily Skin Tips) मॉइश्चरायझर वापरणं टाळणं ही मोठी चूक ठरते. ऑयली स्किन असली तरी त्वचेला हायड्रेशनची गरज असते. त्यामुळे हलक्या जेल-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करा. हायलूरोनिक अॅसिड आणि नायसिनामाइड असलेले प्रॉडक्ट्स त्वचेला ओलावा देतात आणि तेलाचं प्रमाण संतुलित ठेवतात. सनस्क्रीन वापरणंही तितकंच गरजेचं आहे. उन्हाळ्यात SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं मॅट फिनिश सनस्क्रीन वापरावं. यामुळे त्वचा सूर्याच्या किरणांपासून सुरक्षित राहते आणि तेलकटपणाही कमी दिसतो. दिवसभरात चेहरा खूप ऑयली वाटत असेल, तर ब्लॉटिंग पेपरचा वापर करता येतो. हे पेपर हलक्या हाताने चेहऱ्यावर दाबल्याने अतिरिक्त तेल शोषलं जातं आणि मेकअपही खराब होत नाही. या छोट्या पण प्रभावी टिप्सचा नियमित वापर केल्यास ऑयली स्किनचा त्रास कमी होतो आणि त्वचा स्वच्छ, तजेलदार आणि निरोगी राहते. योग्य स्किन केअर रूटीन पाळणं हीच सुंदर त्वचेची गुरुकिल्ली आहे.