तेल कंपन्यांनी रोखला जेट एअरवेजचा इंधन पुरवठा

दिल्ली – कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जेट एअरवेजचे संकट टळण्याचे नाव घेत नसल्याचे दिसत आहे. यापूर्वी पुरवठादार,विमानांचे भाडे आणि वैमानिकांना वेळेवर पैसे देऊ शकत नसल्यामुळे यापैकी काहींनी एअरलाइन बरोबरील करार संपुष्टात आणला होता.

त्यानंतर आज मिळालेल्या माहितीनुसार तेल कंपन्यांनी जेट एअरवेजचा इंधन पुरवठा काही काळ थांबविला असल्याचे समजले आहे. दिल्ली विमानतळावर जेट एअरवेजकडून तेल कंपन्यांची थकीत रक्कम न दिल्यामुळे एक तासापेक्षा अधिक काळ इंधन पुरवठा थांबविला होता, अशी माहिती मिळाली आहे. संध्यकाळी ५ वाजता तेल कंपन्यांकडून होणार पुरवठा थांबविण्यात आला होता, त्यानंतर पुन्हा जेट एअरवेजकडून थकीत भरणा निश्चित झाल्यानंतर सुमारे ६.१५ वाजता तेल पुरवठा सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.