Chitra Wagh on Vijay Vadettiwar | पहलगाम हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी पर्यटकांना जीवे मारताना धर्म विचारुन गोळ्या झाडल्याचं काही मृतांच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. यावरुन धार्मिक वाद होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच ‘दहशतवादी हल्ला करताना त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का?’ असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. ज्यानंतर वडेट्टीवारांवर टीका देखील केली जात आहे. यावरून भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे. Chitra Wagh on Vijay Vadettiwar | ‘काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत’ “काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला पती, भाऊ तर कुणी आपला बाप गमावला आहे. संपूर्ण देशच नाही तर जगाला याचं दुःख वाटतंय. ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले ते रडून आपबिती सांगत आहेत. हा दहशतवादी हल्ला हिंदूंचा नरसंहार होता हे स्पष्ट होतंय. काँग्रेससह महाविकास आघाडीचे नेते हे सत्य नाकारत आहेत,” असा हल्लाबोल चित्रा वाघ यांनी विजय वडेट्टीवारांवर केला. “काँग्रेसमधून रोज कुणी ना कुणी प्रसारमाध्यमांवर येऊन हल्ल्यातील मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना खोटं ठरविण्याची क्रुरचेष्टा करत आहेत. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा… दहशतवाद्यांना पाठीशी घालून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे जनतेला देखील चांगलंच समजलं आहे. राहुल गांधींपासून ते आज वडेट्टीवारांपर्यंत सगळ्यांना त्या दहशतवाद्यांचा इतका का पुळका आलाय?” असा सवालही वाघ यांनी विचारला आहे. Chitra Wagh on Vijay Vadettiwar | काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार ? “पहलगाम हल्ला हे सरकारचं अपयश नाही का? त्यावर या सरकारमधील लोक काहीच बोलत नाहीत. हे लोक काय बोलतात तर दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांना मारलं. अरे मुळात यासाठी वेळ असतो का? प्रत्येकाच्या जवळ जाऊन, त्याच्या कानात बोलायला, त्याचा धर्म विचारायला वेळ असतो का? यावरून बरेच वाद आहेत. काही लोक म्हणाले, दहशतवाद्यांनी धर्म विचारला, तर काहीजण म्हणत आहेत की असं काही घडलं नाही. मुळात दहशतवाद्याचा धर्म किंवा त्याची कुठलीही जात नसते,” असे विजय वडेट्टीवार यांनी म्हंटले. Chitra Wagh on Vijay Vadettiwar | हेही वाचा : विशेष : नृत्य; एक अभिजात कला