नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे पुत्र कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची चौकशी केल्यानंतर अमलबजावणी संचालनालयाने नॅशनल हेराल्डच्या इमारतीत असलेले यंग इंडियाचे कार्यालय सील केले आहे. आमच्या परवानगीशिवाय हे कार्यालय उघडण्याचा कोणी प्रयत्न करू नये. तसे केले तर तो गुन्हा ठरेल, असे ईडीने म्हटले आहे.
दरम्यान, ईडीच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कॉंग्रेस मुख्यालयाच्या बाहेरील बंदोबस्त वाढवला आहे. कार्यालय सील केल्यामुळे गोंधळ निर्माण होण्याची शंका पोलिसांना होती त्यामुळे खबरदारी म्हणून हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
कामशेत : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणारा आरोपी 24 तासांत गजाआड
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेरील बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. सोनिया यांना जेव्हा ईडीने चौकशीसाठी बोलावले होते तेव्हा दिल्लीत बराच गोंधळ माजला होता. त्यामुळे आता यंग इंडियाचे कार्यालय सील केले तर कॉंग्रेस कार्यकर्ते भडकू शकतात त्यामुळे काळजी घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही गोंधळाची स्थिती निर्माण झालीच तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच थोपवली जाण्याच्या दृष्टीने सगळी तयारी करण्यात आली आहे.