Akanksha Puri : आंदोलनात सहभागी होण्यासाठी पैशांची ऑफर? अभिनेत्री आकांक्षा पुरीच्या दाव्याने खळबळ “मलाही अशा प्रकारच्या…”
Akanksha Puri : या दाव्यामुळे मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

Akanksha Puri : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॅाकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. महिन्याभरापासून हे आंदोलन सुरू असून त्याची व्याप्ती वाढत चाललेली आहे. आता देशभरातील प्रमुख शहरांमध्ये देखील तरुणांकडून आंदोलन केले जात आहे. (Akanksha Puri)
विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकरांनी पाठिंबा दर्शवला आहे. काही कलाकारांचे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर काही कलाकार आंदोलन स्थळी जाऊन आंदोलनात सहभागी देखील होत आहेत. (Akanksha Puri)
अशातच अभिनेत्री आकांक्षा पुरीने धक्कादायक दावा केला आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांना सध्या सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा देण्यासाठी पैशांची अॅाफर दिली जात असल्याचा खळबळजनक दावा तिने केला आहे. या दाव्यामुळे मनोरंजनविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
धक्कादायक खुलासा (Akanksha Puri)
‘बिग बॉस OTT’ आणि ‘विघ्नहर्ता गणेश’ या कार्यक्रमांमधून आकांक्षा पुरीला प्रसिद्धी मिळाली. तिने थेट इंडस्ट्रीतील कलाकारांवर केलेल्या दाव्यामुळे ती चर्चेत आली असून, तिने कोणाचंही नाव घेतलेलं नाही. धक्कादायक बाब म्हणजे तिलाही अशा प्रकारच्या ऑफर्स आल्या होत्या, असा खुलासाही अभिनेत्रीने केला आहे. मात्र तिने कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा व्यक्तीचे नाव घेतलेले नाही.
आकांक्षाच्या म्हणण्यानुसार, काही लोक कलाकारांशी संपर्क साधून त्यांना रॅली, प्रचार मोहिमा किंवा आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. प्रसिद्धी किंवा आर्थिक फायद्यासाठी सामाजिक प्रश्नांमध्ये सहभागी होणे योग्य नसल्याचे सांगत तिने अशा कोणत्याही उपक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाली आकांक्षा पुरी? (Akanksha Puri)
एका मुलाखतीत बोलताना आकांक्षा म्हणाली की, “सामाजिक किंवा राष्ट्रीय प्रश्नांवर भूमिका घेताना ती केवळ योग्य कारणांसाठीच उभी राहते. कोणत्याही आंदोलनाचा किंवा संवेदनशील विषयाचा प्रसिद्धी किंवा मार्केटिंगसाठी वापर होऊ नये. मलाही अशा प्रकारच्या ऑफर्स आल्या होत्या आणि इंडस्ट्रीतील अनेक कलाकार तसेच कंटेंट क्रिएटर्सना याची माहिती आहे.”
समस्या तातडीने सोडवण्याचे आवाहन (Akanksha Puri)
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत बोलताना आकांक्षा पुरी म्हणाली की, “विद्यार्थ्यांची अवस्था पाहून तिला खूप वेदना झाल्या आहेत. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून त्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे,” असे ती म्हणाली. आंदोलनादरम्यान समोर आलेले फोटो आणि व्हिडिओ पाहून ती अस्वस्थ झाल्याचेही तिने नमूद केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या गांभीर्याने घेत त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे आवाहनही तिने सरकारला केले आहे.
वांगचुक यांनी उपोषण सोडलं
दरम्यान, नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरातील विद्यार्थ्यांचे राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा विस्तार अनेक राज्यांपर्यंत पोहचला आहे. या दरम्यान काल मध्यरात्री दिल्लीत मोठी घडामोड घडली. सामाजिक कार्यकर्ते सोमन वांगचुक यांना ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे जाऊन केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी वांगचुक यांच्या तीन अटी मान्य केल्या. यानंतर वांगचुक यांनी उपोषण सोडलं. मात्र, कॅाकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत दिला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार केला आहे.
Share Market: कच्च्या तेलाच्या संकटामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती ; सेन्सेक्स अन निफ्टी घसरले





