रेल्वेकडून प्रवाशांसाठी नवीन ऑफर ; येण्या-जाण्याची तिकिटं एकत्र बुक करा अन् मिळवा भरघोस सूट

Offer from Railways । रेल्वेने प्रवाशांसाठी एक खुशखबर दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून राउंड ट्रिप पॅकेज योजना जाहीर केली आहे, ज्याअंतर्गत परतीच्या प्रवासात २०% सूट दिली जाणार आहे. ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबवली जाणार आहे, जेणेकरून त्याचा परिणाम आणि प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करता येणार आहे.
रेल्वेने सणासुदीच्या काळात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ‘राउंड ट्रिप पॅकेज’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत, निर्धारित वेळेत परतीचा प्रवास बुक करणाऱ्या प्रवाशांना रिटर्न तिकिटाच्या मूळ भाड्यावर २०% सूट मिळेल.
‘कनेक्टिंग जर्नी फीचर‘ द्वारे तिकिटे बुक केली जातील Offer from Railways ।
ही योजना १४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. याअंतर्गत, पहिल्या प्रवासाचे (ऑनवर्ड जर्नी) तिकीट १३ ऑक्टोबर २०२५ ते २६ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या तारखेसाठी बुक करावे लागणार आहे. त्यानंतर, १७ नोव्हेंबर २०२५ ते १ डिसेंबर २०२५ दरम्यानच्या तारखांसाठी ‘कनेक्टिंग जर्नी फीचर’ द्वारे परतीच्या प्रवासाचे तिकीट बुक करता येईल.
बेस फेअरवर सवलत उपलब्ध असेल Offer from Railways ।
या योजनेत दोन्ही बाजूंची तिकिटे कन्फर्म झाली असतील आणि ती एकाच प्रवाशांच्या नावावर असतील तरच सवलत मिळेल. परतीच्या तिकिटांच्या बुकिंगसाठी आगाऊ आरक्षण कालावधी लागू होणार नाही. परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावरच सवलत दिली जाईल. रेल्वेने सांगितले की, ही योजना सध्या प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात आली आहे, जेणेकरून सणांच्या काळात दोन्ही बाजूंनी गाड्यांचा वापर चांगल्या प्रकारे करता येईल.





