मंचर- घोडेगाव (ता. आंबेगाव येथील एका विवाहित महिलेला फेसबुकवर अश्लील मेसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
रविवार (दि. 12) ते बुधवार (दि. 15) या कालावधीत अज्ञात व्यक्तीने संबंधित महिलेला फेसबुक मेसेजद्वारे अश्लील मेसेज पाठवून शारीरिक सुखाची मागणी केली. याबाबत पिडित महिलेने तिच्या पतीला माहिती दिली. त्यानुसार घोडेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार करीत आहेत.