#INDvAFG | भारत व अफगाणीस्तानमध्ये होणार एकदिवसीय मालिका
Updated On:

काबूल – भारतीय क्रिकेट संघ अफगाणीस्तानविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यंची मालिका खेळणार आहे. याबाबतची माहिती अफगाणीस्तान क्रिकेट मंडळाने आपल्या वार्षीक स्पर्धांच्या वेळापत्रकात दिली आहे. याबाबत अद्याप बीसीसीआयने दुजोरा दिलेला नाही.
भारतीय क्रिकेट संघ येत्या गुरूवारी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथे कसोटी व एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढील वर्षीची आयपीएल स्पर्धा होण्यापूर्वी अफगाणीस्तानचा संघ भारतात येणार आहे.
ही मालिका मार्च महिन्यात होणार आहे. अफगामीस्तानचा संघ नव्या वेळापत्रकानूसार येत्या काळात 11 एकदिवसीय, 4 टी-20 आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका विविध देशांशी खेळणार आहे.
भारतासह अफगाणिस्तानचा संघ नेदरलॅंड, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड या संघाविरुद्धही मालिका खेळणार आहे.





