October OTT Releases: ऑक्टोबर 2025 OTT रिलीज: प्रेक्षकांना मिळणार धमाकेदार मनोरंजनाचा डोस

October OTT Releases: ऑक्टोबर महिन्यात चित्रपटगृहांसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रेक्षकांना भरपूर नवी फिल्म्स आणि वेबसीरिज पाहायला मिळणार आहेत. जर तुम्हीही घरी बसून मनोरंजनाचा आनंद घ्यायला उत्सुक असाल, तर या महिन्यात कोणते चित्रपट आणि सीरिज येत आहेत, त्यावर एक नजर टाकूया.
या महिन्यात ओटीटीवर येणारे चित्रपट आणि सीरिज
1. Nobody Wants This Season 2
लोकप्रिय वेबसीरिज नोबडी वाँट्स धिस चा दुसरा सीझन 23 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित होणार आहे. यात क्रिस्टन बेल, अॅडम ब्रॉडी, जस्टिन लूप आणि टिमोथी सिमन्स झळकणार आहेत.
2. Our Fault
निकोल वालेस आणि गेब्रियल ग्वेरा यांच्या प्रमुख भूमिका असलेला अवर फॉल्ट हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओ वर प्रदर्शित होईल. या चित्रपटात अनेक नामांकित कलाकार झळकणार आहेत.
3. Search: The Naina Murder Case
कोंकणा सेन शर्मा यांच्या अभिनयाची झलक असलेली ही वेबसीरिज 10 ऑक्टोबरला जिओ हॉटस्टार वर प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले आहे.
4. The Woman in Cabin 10
मिस्ट्री आणि ड्रामाने भरलेली ही कथा एका पत्रकाराभोवती फिरते, जिला एका आलिशान यॉटवर खूनाच रहस्य शोधायचे असते. ही मालिका 10 ऑक्टोबरला नेटफ्लिक्स वर पाहायला मिळेल.
5. Madharaasi
शिवकार्तिकेयन आणि विद्युत जामवाल यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा मल्टीलँग्वेज चित्रपट (तमिळ, तेलुगु, मलयाळम, हिंदी, कन्नड) 11 ऑक्टोबर रोजी प्राइम व्हिडिओ वर रिलीज होणार आहे.
6. Steve
स्टीव हा चित्रपट 3 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे. यात सिलियन मर्फी, एमिली वॉटसन आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
7. The Game: You Never Play Alone
हा शो एका व्हिडिओ गेम डेव्हलपरच्या कथानकावर आधारित असून श्रद्धा श्रीनाथ, हेमा आणि विविया संथ यात दिसणार आहेत. हा शो 2 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला आहे.
एकंदर पाहता, या ऑक्टोबर महिन्यात प्रेक्षकांना थ्रिलर, ड्रामा, मिस्ट्री आणि रोमॅन्सचा जबरदस्त मेळ ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.





