#NZvPAK : न्यूझीलंडचा पाकवर मोठा विजय

ख्राईस्टचर्च – गोलंदाजांनंतर फलंदाजांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने टी-20 सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात पाकिस्तानवर 9 गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला.
A 117-run opening partnership between @FinnAllen32 (62) & Devon Conway (49*) sees the team to victory in Match 4 of the T20 Tri-Series 🏏
Scores | https://t.co/3D2LGOOdCz#NZvPAK pic.twitter.com/CtbAGLBnCG
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 11, 2022
पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानला केवळ 130 धावाच करता आल्या. त्यांच्याकडून इफ्तेकार अहमद 27, असीफ अली नाबाद 25, कर्णधार बाबर आझम 21 यांनी थोडीफार चमक दाखवली. न्यूझीलंडकडून टीम साऊदी, मिचेल सॅन्टनर व मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक 131 धावा न्यूझीलंडने केवळ 1 गडी गमावून पूर्ण केल्या व थाटात विजय साकार केला. त्यांच्याकडून फिन ऍलनने 62 तर, डेव्हन कॉनवेने नाबाद 49 धावांची खेळी केली.
पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तिरंगी मालिका खेळली जात असून या मालिकेत यापूर्वी पाकिस्तानने बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता.





