\n

न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज केन विल्यमसन त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्प्यात आहे. विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही शतक झळकावले आहे. विल्यमसनचे कसोटी क्रिकेटमधील हे 31 वे शतक ठरले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत विल्यमसन आता भारताच्या विराट कोहली आणि इंग्लंडच्या जो रूटच्या पुढे आहे. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये आता फक्त ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसनच्या पुढे आहे.

\n

फॅब-4 मध्ये दुसऱ्या स्थानावर…

\n

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात झळकावलेले शतक हे केन विल्यमसनच्या कसोटी कारकिर्दीतील 31वे शतक आहे. फॅब-4 मध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विल्यमसन आता दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या जो रूटची 30 आणि भारताच्या विराट कोहलीची 29 शतके आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या नावावर 32 शतके आहेत. (फॅब-4  : विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विल्यमसन हे मागील एक दशकापासून कसोटी क्रिकेटमधील चार महान फलंदाज झाले आहेत. नव्या पिढीतील हे चार फलंदाज फॅब-4 म्हणून ओळखले जातात.)

\n

फॅब-4 मध्ये सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारे खेळाडू

\n

स्टीव्ह स्मिथ – 32 शतके (107 सामने)
\nकेन विल्यमसन – 31* शतके (97 सामने)
\nजो रुट -30 शतके (137 सामने)
\nविराट कोहली – 29 शतके (113 सामने)

\n

सर्वात कमी डावात 31 शतके करणारा तिसरा फलंदाज…

\n

न्यूझीलंडचा केन विल्यमसन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावात 31 शतके झळकावणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. विल्यमसनने कसोटी क्रिकेटमधील आपल्या 170व्या डावात 31वे शतक झळकावले आहे. या विक्रमांच्या यादीत विल्यमसनने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज रिकी पाँटिंग आणि पाकिस्तानचा माजी महान फलंदाज युनिस खानला मागे टाकले आहे. युनूस खानने 184 डावात 31 शतके झळकावली होती. तर पाँटिंगने 174 डावात 31 शतके झळकावली होती.

\n

IND vs ENG : आर. अश्विनने रचला इतिहास, ‘विशाखापट्टणम’मध्ये मोडला 45 वर्षे जुना विक्रम…

\n

\n

न्यूझीलंड मजबूत स्थितीत….

\n

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडचा संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडने पहिल्या डावात 511 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 162 धावांवर ऑलआऊट झाला. न्यूझीलंडने फॉलोऑन करण्याऐवजी पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 4 गडी गमावून 179 धावा केल्या आहेत. अशा प्रकारे न्यूझीलंडकडे 528 धावांची आघाडी आहे. सामन्याला अजून दोन दिवस बाकी आहेत.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"NZ vs SA 1st Test : केन विल्यमसनचे रेकॉर्डब्रेक 31वे शतक, फॅब-4 मध्ये आघाडी घेत कसोटीत रचला खास विक्रम…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/kw.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nz-vs-sa-1st-test-kane-williamsons-bat-lit-up-scored-centuries-in-both-the-innings-amazing-record-name#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/kw.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/nz-vs-sa-1st-test-kane-williamsons-bat-lit-up-scored-centuries-in-both-the-innings-amazing-record-name#webpage","name":"NZ vs SA 1st Test : केन विल्यमसनचे रेकॉर्डब्रेक 31वे शतक, फॅब-4 मध्ये आघाडी घेत कसोटीत रचला खास विक्रम…","url":"https://www.dainikprabhat.com/nz-vs-sa-1st-test-kane-williamsons-bat-lit-up-scored-centuries-in-both-the-innings-amazing-record-name","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/nz-vs-sa-1st-test-kane-williamsons-bat-lit-up-scored-centuries-in-both-the-innings-amazing-record-name#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/02/kw.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/nz-vs-sa-1st-test-kane-williamsons-bat-lit-up-scored-centuries-in-both-the-innings-amazing-record-name#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/nz-vs-sa-1st-test-kane-williamsons-bat-lit-up-scored-centuries-in-both-the-innings-amazing-record-name","name":"NZ vs SA 1st Test : केन विल्यमसनचे रेकॉर्डब्रेक 31वे शतक, फॅब-4 मध्ये आघाडी घेत कसोटीत रचला खास विक्रम…"}}]}}}

NZ vs SA 1st Test : केन विल्यमसनचे रेकॉर्डब्रेक 31वे शतक, फॅब-4 मध्ये आघाडी घेत कसोटीत रचला खास विक्रम…