माऊंट माऊनगनुई – नवनियुक्त कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा न्यूझीलंडविरुद्ध ( NZ vs IND )उद्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. पहिला सामना संततधार पावसाने रद्द करावा लागल्यामुळे मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील आहेत. अर्थात पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यावरही पावसाचे सावट कायम आहे.
#VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने ठोकले ४ सामन्यात ४ शतकं
या मालिकेसाठी नियमित कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे. संघातील नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी या मालिकेद्वारे निर्माण झाली आहे. संघाच्या फलंदाजी प्रमुख मदार कर्णधार पंड्या, भरात असलेला सूर्यकुमार यादव, इशान किशन, शुभमन गिल, दीपक हुडा, श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांच्यावरच राहणार आहे.
गोलंदाजीबाबत बोलायचे तर नवोदित डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवरच प्रमुख मदार राहणार आहे. त्याच्या जोडीला अनुभवी भूवनेश्वर कुमार व महंमद सिराज असले तरीही आयपीएल स्टार नवोदित वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. तसेच हर्षल पटेललाही या मालिकेद्वारे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. संघात अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संजू सॅमसनला खेळवणार का ऋषभ पंतला ते सामन्यापूर्वी खेळपट्टीचे स्वरुप पाहूनच निर्णय घेतला जाणार आहे.
#VijayHazareTrophy । CSK संघाने बाहेर काढले अन् पठ्ठ्याने ठोकले ४ सामन्यात ४ शतकं
दुसरीकडे न्यूझीलंडचा संघही मायदेशातील ही मालिका गांभीर्याने खेळेल. त्यांनाही ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत निराशेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे कर्णधार केन विल्यमसनला घरच्या प्रेक्षकांसमोर सरस खेळ करण्याचे आव्हान राहणार आहे. सातत्याने अपयशी ठरूनही विल्यमसनकडेच नेतृत्व कायम ठेवले गेले आहे. त्यांची फलंदाजी फिन ऍलेन, डेव्हन कॉनवे, डॅरेल मिशेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स निशाम व टॉम लॅथम अशी भक्कम आहे. गोलंदाजीत तर अनुभवी टीम साऊदी, मिचेल सॅन्टनर, इश सोधी, ऍडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन व नवोदित ब्लेअर टीक्नेर असा तुल्यबळ ताफा आहे.
स्विंग गोलंदाजी व पावसाचे दडपण
ही मालिका मुळातच हिवाळ्यात होत असल्यामुळे येथे वेगवान गोलंदाजांना स्विंग मिळेल असेच चित्र आहे. त्यामुळे न्यूझीलंडला दाखल झालेल्या भारतीय संघातील फलंदाजांना या स्विंगचा सामना करण्याच्या दडपणावर मात करावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. गेले तीन दिवस येथे दिवसभारत पावसाच्या काही सरी पडत असल्यामुळे हा सामना होणार का असाही प्रश्न उभा ठाकला आहे.
उद्याचा ( NZ vs IND ) दुसरा टी-20 सामना
न्यूझीलंड विरुद्ध भारत
ठाकाण – बे ओव्हल, माऊंट माऊनगनुई
वेळ ः भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 12 पासून
थेट प्रक्षेपण – डीडी स्पोर्टस