Amol Mitkari : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाकडे शेतकरी, सर्वसामान्य, उद्योपती यासंह सर्वच क्षेत्रातील लोकांच्या नजरा लागल्या होत्या. अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पण दिवंगत उपमुख्यमंत्री तथा माजी अर्थमंत्री अजित पवार यांची कमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांना जाणवली. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी नेत्यांच्या भावूक प्रतिक्रिया समोर आल्या. देवेंद्र फडणवीस यांनी देखील अजितदादांचा उल्लेख करत भावूक प्रतिक्रिया देत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी एक फोटो शेअर करत ट्वीट केले आहे. अमोल मिटकरी यांनी ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर तिघांची संयुक्त पत्रकार परिषद होत असे. त्यापैकी हा फोटो असल्याचे दिसते. या फोटोच्या ट्वीटमध्ये अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हे चित्र या वर्षी पत्रकार बांधवाना बघायला मिळालं नाही व महाराष्ट्राला बघायला मिळाणार नाही आणि भविष्यात मिळणारही नाही. कालचा अर्थसंकल्प दादाविना अधुराच होता. दादा विना महाराष्ट्र ही कल्पना कुणालाही इतक्या सहज विसरता येणार नाही. असे म्हटले आहे. अमोल मिटकरींचे ट्वीट (Amol Mitkari) अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हे चित्र या वर्षी पत्रकार बांधवाना व महाराष्ट्राला बघायला मिळाल नाही आणि भविष्यात मिळणारही नाही.कालचा अर्थसंकल्प दादाविना अधुराच होता.दादा विना महाराष्ट्र ही कल्पना कुणालाही इतक्या सहज विसरता येणार नाही. असा देवमाणूस एका क्षणात सहज निघुन जाण हे राज्याला परवडणारं नाही. दादांच असणं व दादांच नसणं किती फायद्याच व तोट्याचं आहे हे समोर जसजसे दिवस उलटतील तसे कळेल.दादांच्या विमान अपघाताचा शोध घेऊन खर काय खोट काय हे सत्य जनतेसमोर आणणे हीच त्यांना आदरांजली ठरेल. अर्थात त्यासाठी लढा उभारावा लागेल.नाहीतर हा विषय AI च्या या युगात क्षणात मागे पडेल, अशी भीती देखील अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. Amol Mitkari काल ६ मार्ज रोजी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषद दरवेळी दिसणारे हास्याचे फटकारे यावेळी दिसले नाहीत. सुनेत्रा पवार यांनी अजितदांदाचे स्मारक आणि त्यांच्या नावे सुरू करण्यात येणाऱ्या नागरी पुरस्काराबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. हेही वाचा : International Women’s Day: महिलांच्या आरोग्यासाठी इशारा! पुरुषांपेक्षा महिलांना या पाच आजारांचा जास्त धोका