Milind Narvekar Post : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालकांचे अभिनंदन ; नार्वेकरांची पोस्ट, दमानियांचा ‘खरं की काय’ रिप्लाय

मुंबईः मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी चर्चेत असलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर राज्यभरातून नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे अभिनंदन केले आहे. नार्वेकर यांनी त्यांच्या एक्सच्या अकाऊंटरवरून एक पोस्ट शेअर करून त्यांचे अभिनंदन केले आहे. मात्र, नार्वेकरांनी केलेल्या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. सोशल मीडियावर त्यांची पोस्ट चर्चेत आली असून यावर अंजली दमानिया यांनी खोचक शब्दांत रिप्लाय दिला आहे.
नार्वेकरांच्या पोस्टवर दमानियांचे ‘खरं की काय’
“मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांचे अभिनंदन!’ अशी पोस्ट नार्वेकरांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टबद्दल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न केला असता त्यांनी यावर बोलणं टाळलं. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरं की काय असे म्हणत नार्वेकरांच्या पोस्टाला खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला जी यांचे अभिनंदन!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 31, 2024





