‘आता वय झालं रिटायरमेंट घे!’; नेटकऱ्याने खिल्ली उडवताच शाहरुखने दिले सडेतोड उत्तर
Shahrukh Khan | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटासाठी चाहते उत्सुक आहेत. यात त्याच्यासोबत सुहाना खान देखील झळकणार आहे. पहिल्यांदा बाप-लेकाची जोडी एकत्र काम करताना दिसणार असल्याने या चित्रपटाबाबत अनेकांना फार अपेक्षा आहेत. मात्र सध्या शाहरुख एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.
नुकतेच शाहरुखने #askSRK हे प्रश्न-उत्तरांचं खास सेशन घेतलं. त्यावेळी एका नेटकऱ्याच्या विचारलेलया प्रश्नाला शाहरुखने दिलेलया सडेतोड उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. Shahrukh Khan |
एका नेटकऱ्याने किंग खानची खिल्ली उडवत, ‘भाई आता वय झालं रिटायरमेंट घे! दुसऱ्या मुलांना पुढे येऊ दे” असे म्हंटले. नेटकऱ्याने विचारलेल्या या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, “भाई, तुझ्या प्रश्नामधील बालिशपणा जेव्हा निघून जाईल तेव्हा काहीतरी चांगलं विचार. तोपर्यंत तू तात्पुरती निवृत्ती घे.” अशा शब्दात शाहरुखने नेटकऱ्याला सुनावले. Shahrukh Khan |
शाहरुख खानला दुखापत
शाहरुखचे २०२३ मध्ये ‘पठाण’, ‘जवान’, ‘डंकी’ हे तिन्ही सिनेमा सुपरहिट ठरले. सध्या शाहरुख ‘किंग’ सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शूट करताना शाहरुख खान जखमी झाल्याची बातमी आली होती. ‘किंग’च्या सेटवर शाहरुख खानला दुखापत झाल्याने चित्रीकरण थांबवण्यात आले होते.
या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे म्हंटले जात आहे. सुरुवातीला ‘किंग’ चित्रपट गांधी जयंती 2026 ला रिलीज होणार होता, पण आता ते शक्य नसल्याने चित्रपटाची रिलीज डेट 2027 च्या सुरुवातीला पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे. Shahrukh Khan |
हेही वाचा :
Pune Breaking : भयंकर..! निगडीत कंपनीतील विषारी वायूमुळे ३ कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू





