मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल एक मोठं वक्तव्य केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत ही अनेकांची इच्छा आहे. त्यानुसार, तो निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यानंतर आता, सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. मला आधी साहेबांना भेटावे लागेल, जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल. साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं सुप्रिया सुळे यांनी म्हंटल आहे. साताऱ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त खूप दिवसांनी पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार हे आज साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर होते. त्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता, आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो असं उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. पुढे बोलताना म्हणाले, राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत. आमचे 8 खासदार काय निर्णय घेतील ते पाहूयात. आधी लग्न कोंढाण्याचं, सध्या राष्ट्र मग नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. Supriya sule | आमचे 8 ही खासदार उत्तम परफॉर्म करणारे आहेत. 8 खासदार एकत्रित आहेत, जो निर्णय घेतला जाईल तो एकत्रित घेतला जाईल. मला आधी साहेबांना भेटावे लागेल, जेव्हा भेट होईल तेव्हा साहेबांशी चर्चा करेल. साहेब आणि जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. शरद पवारांच्या विधानाने चर्चाना उधाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे ही त्यांची इच्छा आहे. याबाबत अनेकांनी व्यक्तिशः इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आता या प्रक्रियेपासून आपण अलिप्त असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकप्रतिनिधी आणि अनेक नेत्यांनी शरद पवारांच्या या वक्तव्याचे स्वागत केले तर अनेक नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Ajit pawar |