आता स्वानंदी बेर्डे म्हणणार… “धनंजय माने इथेच राहतात का?’

पुणे – दिवंगत अभिनेते ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ हे मराठी सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत आता त्यांची कन्या स्वानंदी बेर्डे रंगमंचावर पदार्पण करत आहे. स्वानंदीचं एक नवं कोर नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
विशेष बाब म्हणजे या नाटकाला पुण्यातून सुरुवात होतेय. “धनंजय माने इथेच राहतात का?’ असं या आगामी नाटकाचं नाव आहे. नुकतंच या नाटकाचं पाहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलं असून, स्वानंदीच्या या नाटकाला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे या नाटकात स्वानंदी ‘सौ. माने’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.
लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डे यांची कन्या स्वानंदी रंगमंचावर पदार्पण करते आहे. नाटकाला पुण्यातून सुरुवात होतेय. आधी लक्ष्मीकांत मग प्रिया मग अभिनय आणि आता स्वानंदी. खूप शुभेच्छा. नाटकाचं हे पहिलं पोस्टर.#नाटक #मराठी @RAJDESHPSNDE @SwanandiB @PrreeyaB @abpmajhatv pic.twitter.com/NB2F4qBHAZ
— Soumitra Pote । सौमित्र पोटे (@soumitrapote) February 27, 2021
“धनंजय माने इथेच राहतात का?’ हे नाटक नितीश चव्हाण यांनी लिहलं आहे. तर नाटकाचे दिग्दर्शन, गीत राजेश देशपांडे यांनी केलं. “अशी ही बनवाबनवी’ या सुपरहिट चित्रपटातील ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हा संवाद खुपच लोकप्रिय झाला. अनेक विनोदांमध्ये हा डायलॉग व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं.
— swanandi berde (@SwanandiB) August 27, 2020





