पंकज त्रिपाठी पुन्हा माधव मिश्राच्या भूमिकेत! यावेळी सत्याला दोन नाही, तर तीन पैलू; कसा आहे Criminal Justice 4 चा ट्रेलर?

Criminal Justice 4 : सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेल्या ‘क्रिमनल जस्टिस’ या मर्डर मिस्ट्री वेब सिरीजचा चौथ्या सिजनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिजनचा ट्रेलर अत्यंत उत्कंठावर्धक असून अभिनेता पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा माधव मिश्रा या वकिलाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सिरीजच्या नव्या सिजनमध्ये नवी केस माधव मिश्राकडे आली असून पुन्हा एकदा खूनाचे गूढ उलघताना पाहायला मिळणार आहे. या सिजनमध्ये विवाहबाह्य संबंधांचा अँगल अधोरेखित करण्यात आला आहे. यामुळे चाहत्यांना या सिरीजच्या रिलीजचे वेध लागले आहेत.
दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये माधव मिश्रा यांच्याकडे एक हाय प्रोफाइल केस आली आहे. ज्यामध्ये डॉ. राज नागपाल यांच्यावर त्यांच्या प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. पतीला वाचवण्यासाठी, राज नागपालची पत्नी अंजू नागपाल प्रसिद्ध वकील माधव मिश्रा यांच्याकडे जाते. त्यानंतर अंजू नागपाल स्वतः आरोपी कशी बनते आणि ती स्वतःसाठी वेगळा वकील कसा देते? अशाप्रकारे, एका प्रकरणात दोन आरोपी आणि तीन वकील येतात. येथून कथा पुढे सरकते आणि एक जबरदस्त सस्पेन्सफुल कोर्टरूम ड्रामा सुरू होतो. अशी स्टोरी ट्रेलरमधून दिसत आहे.
अभिनेता झीशान अय्युबने पंकज त्रिपाठीसोबत क्रिमिनल जस्टिसच्या चौथ्या सीजनमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यामुळे या दोन कलाकारांचा स्क्रीन प्रेझेन्स पाहण्याची एक पर्वणी प्रक्षेकांना पाहता येणार आहे. याशिवाय श्वेता बसू प्रसाद, मीता वशिष्ठ, सुरवीन चावला, आशा नेगी, खुशबू अत्रे, बरखा सिंग आणि आत्मा प्रकाश मिश्रा या कलाकारांच्या देखील लक्षवेधी भूमिका आहेत. क्रिमिनल जस्टीसच्या चौथ्या सिजनचे दिग्दर्शन रोहन सिप्पी यांनी केले असून हा सिजन २९ मे पासून जिओ हॅाटस्टरवर प्रसारित करण्यात येणार आहे.





