अभिनेता पंकज त्रिपाठीचा हटके अंदाज; रणवीर सिंग म्हणाला ‘हे काय गुरुजी?…’

Pankaj Tripathi | बॉलिवूड अभिनेता पंकज त्रिपाठीने सोशल मिडियावर काही हटके अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. त्याच्या या लुकने नेटकऱ्यांसह सेलिब्रिटी देखील थक्क झाले आहेत. त्याचा हा अंदाज अनेकांना पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे.
या फोटोंमध्ये पंकजने डार्क ग्रीन रंगाची मखमली शेरवानी जॅकेट परिधान केली आहे, ज्यावर बारीक सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. त्यासोबत त्याने काळ्या रंगाचा एम्ब्रॉइडरी शर्ट आणि लाल सलवार घातली आहे. या पारंपरिक लूकला आधुनिक टच देण्यासाठी पंकजने हिरव्या रंगाचा लांब ब्लेझर आणि टोपी देखील घातली आहे.
या नव्या लूकसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं की, “एक नवी सुरुवात… काहीतरी रोमांचक येतंय. तुम्हाला ही वाइब कशी वाटली?” सध्या त्याच्या या फोटोवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे रणवीर सिंगने देखील यावर एक मजेशीर कमेंट केली आहे. ‘अरेरे, हे काय गुरुजी? आम्ही सुधारलो आणि तुम्ही बिघडलात’, तर गायिका हर्षदीप कौर म्हणाली, ‘ओहू, काय बात!’ असे म्हंटले आहे. सध्या पंकजचा हा लुक अनेकांच्या पसंतीस पडत आहे. Pankaj Tripathi |
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, पंकज त्रिपाठी लवकरच ‘मिर्झापूर’च्या पुढील भागात दिसणार आहे. याशिवाय ‘पारिवारिक मनोरंजन’ या चित्रपटात तो अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत झळकणार आहे. अलिकडेच तो ‘मेट्रो इन द दिनो’ या चित्रपटात दिसला होता. Pankaj Tripathi |
हेही वाचा:





