UPI Payment: डिजिटल पेमेंट अधिक सोपे आणि सुरक्षित करण्यासाठी ‘BHIM’ (भीम) ॲपने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता युजर्सना ५,००० रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी वारंवार यूपीआय पिन (UPI PIN) टाकण्याची गरज भासणार नाही. मोबाईलमधील फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकचा वापर करून आता झटपट पेमेंट करता येणार आहे. ५,००० रुपयांपर्यंत विना पिन व्यवहार भीम ॲपमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ‘बायोमेट्रिक’ फीचरमुळे व्यवहार करणे आता पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होणार आहे. अनेकदा युजर्स पिन विसरतात किंवा चुकीचा पिन टाकल्यामुळे पेमेंट फेल होते. ही समस्या टाळण्यासाठी ५,००० रुपयांपर्यंतचे व्यवहार बायोमेट्रिक पद्धतीने करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव ५,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी मात्र यूपीआय पिन टाकणे अनिवार्य असणार आहे. अँड्रॉइड आणि आयफोनवर सुविधा उपलब्ध हे नवीन फीचर अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करेल. ज्या मोबाईलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर किंवा फेस रिकग्निशनची सुविधा आहे, त्या सर्व उपकरणांवर हे फीचर वापरता येईल. मित्र-परिवाराला पैसे पाठवणे, क्यूआर (QR) कोड स्कॅन करणे किंवा ऑनलाइन ट्रान्झॅक्शनसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल. हेही वाचा – OnePlus Nord 6: 7 एप्रिलला भारतात होणार धमाका! 9000mAh बॅटरी आणि 165Hz डिस्प्लेसह नवा ‘किंग’ बाजारात सुरक्षेचा दुहेरी स्तर बायोमेट्रिक डेटा हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र असतो आणि तो मोबाईलमध्येच सुरक्षित साठवलेला असतो. त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी होते. या फीचरमुळे पेमेंट प्रक्रिया केवळ सोपीच नाही, तर अधिक विश्वसनीय आणि सुरक्षितही झाली आहे. हे फीचर कसे सुरू करायचे? १. सर्वात आधी तुमचे ‘BHIM’ ॲप उघडून ‘प्रोफाईल’ (Profile) सेक्शनमध्ये जा. २. तिथे तुमचा बँक खाते निवडा. ३. ‘बायोमेट्रिक ट्रान्झॅक्शन’ (Biometric Transaction) हा पर्याय निवडून तो ‘ऑन’ करा. ४. यानंतर तुम्ही फिंगरप्रिंट किंवा फेस लॉकद्वारे पेमेंट करू शकाल.