फलटण तालुक्यात आता ८ गट, १६ गण, प्रारुप प्रभाग रचना जाहीर

फलटण : फलटण तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गण प्रारुप प्रभाग रचनेचे प्रस्ताव प्रसिद्ध केले आहेत. यापूर्वी फलटण तालुक्यात ७ गट आणि १४ गण होते, त्याऐवजी आता ८ गट व १६ गण तयार करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यात तयार करण्यात आलेल्या ८ गटांची रचनेत तरडगाव गटामध्ये १९ ग्रामपंचायती व २१ गावे समाविष्ट आहेत. या गटात पाडेगाव व तरडगाव हे २ गण आहेत. पाडेगाव गणामध्ये पाडेगाव, परहर खुर्द (पुनर्वसन), कुसुर, मिरेवाडी (कु), रावडी खुर्द, रावडी बुद्रुक, मुरुम, खामगाव, तडवळे, खराडेवाडी आणि कोंडार (पुनर्वसन) ही ११ गावे आहेत. तरडगाव गणामध्ये कोरेगाव, कापडगाव, तरडगाव, वरवंड (पुनर्वसन), माळेवाडी, शिंदेमाळ, विठ्ठलवाडी, डोंबाळवाडी, काळज आणि चव्हाणवाडी ही १० गावे समाविष्ट आहेत.
साखरवाडी पिंपळवाडी गटामध्ये ११ ग्रामपंचायत व ११ गावे समाविष्ट असून या गटात साखरवाडी पिंपळवाडी व सस्तेवाडी या दोन गणांचा समावेश आहे. साखरवाडी पिंपळवाडी गणामध्ये होळ, साखरवाडी पिंपळवाडी, जिंती आणि फडतरवाडी ही ४ गावे समाविष्ट आहेत. तर सस्तेवाडी गणामध्ये भिलकटी, खुंटे, शिंदेवाडी, चौधरवाडी, कांबळेश्वर, सस्तेवाडी आणि अलगुडेवाडी या ७ गावांचा समावेश आहे.
विडणी गटामध्ये ९ ग्रामपंचायती व ९ गावे समाविष्ट असून या गटात सांगवी व विडणी या २ गणांचा समावेश आहे. सांगवी गणामध्ये सोमंथळी, सांगवी, सोनगाव, राजाळे आणि टाकळवाडे या ५ गावांचा समावेश आहे. विडणी गणामध्ये धुळदेव, विडणी, माझेरी (पुनर्वसन) आणि पिंप्रद या ४ गावांचा समावेश आहे.
गुणवरे गटामध्ये १२ ग्रामपंचायती व १२ गावांचा समावेश असून या गटात गुणवरे व आसू या २ गणांचा समावेश आहे. गुणवरे गणामध्ये गुणवरे, सरडे, साठे, मठाचीवाडी आणि खटकेवस्ती या ५ गावांचा समावेश आहे. आसू गणामध्ये आसू, गोखळी, ढवळेवाडी (आसू), पवारवाडी, जाधववाडी (आसू), हनुमंतवाडी आणि शिंदेनगर या ७ गावांचा समावेश आहे.
बरड गटामध्ये १४ ग्रामपंचायती व २२ गावे वाड्यावस्त्यांचा समावेश असून या गटात बरड व दुधेबावी हे २ गण आहेत. त्यापैकी बरड गणामध्ये बरड, बागेवाडी, रांजणी (पुनर्वसन), मुंजवडी, राजुरी, भवानीनगर, विवर (पुनर्वसन), शेरे शिंदेवाडी, निंबळक, वाजेगाव (पुनर्वसन), रांजणी (पुनर्वसन) या ५ ग्रामपंचायती व वाड्या वस्त्यांचा समावेश आहे. कोळकी गटामध्ये १८ ग्रामपंचायती व १९ गावे वाड्या वस्त्यांचा समावेश आहे.
या गटात कोळकी व जाधववाडी (फ) हे २ गण आहेत. त्यापैकी कोळकी गणात कोळकी, गिरवी, धुमाळवाडी, सोनवडी बुद्रुक, भाडळी बुद्रुक, भाडळी खुर्द आणि बोडकेवाडी या ७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जाधववाडी (फ) गणामध्ये झिरपवाडी, दालवडी, विंचुर्णी, कुरवली खुर्द, जोर कुरवली खुर्द (पुनर्वसन), तावडी, जाधववाडी (फ), ठाकूरकी, गोळेगाव (पुनर्वसन), सासकल, निरगुडी, मांडवखडक या ११ गावांचा समावेश आहे.
वाठार निंबाळकर गटामध्ये २६ ग्रामपंचायती आणि ३२ गावे व वाड्या वस्त्यांचा समावेश असून त्यामध्ये वाठार निंबाळकर व सुरवडी या दोन गणांचा समावेश आहे. सुरवडी गणामध्ये १० ग्रामपंचायती व १५ गावे वाड्या वस्त्यांचा समावेश असून त्यामध्ये रायरी गुडे (पुनर्वसन), काशीदवाडी, ढवळेवाडी (निंभोरे), मिरगाव, धामुनशी (पुनर्वसन), नांदल, हिरडोशी (पुनर्वसन), पानस (पुनर्वसन), काटवली (पुनर्वसन), मुळीकवाडी, घाडगेमळा, सुरवडी, निंभोरे आणि घाडगेवाडी यांचा समावेश आहे. हिंगणगाव गटामध्ये २२ ग्रामपंचायती आणि २४ गावे व वाड्या वस्त्यांचा समावेश असून त्यामध्ये सासवड व हिंगणगाव या २ गणांचा समावेश आहे.





