Djokovic Longest Match : ५ तास १५ मिनिटांचा थरार! विम्बल्डनच्या इतिहासातील सर्वात लांब सामना जिंकून जोकोविचने फेडररला टाकलं मागे
Djokovic Longest Match : सेंटर कोर्टवर तब्बल ५ तास १५ मिनिटे चाललेला हा सामना विम्बल्डनच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा पुरुषांचा क्वार्टर फायनल सामना ठरला आहे.

Djokovic vs Felix Longest Wimbledon Quarter Final History : टेनिस जगताचा महानायक नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) वयाच्या ३९ व्या वर्षी विम्बल्डनच्या कोर्टवर असा काही चमत्कार केला आहे, ज्याची इतिहास नेहमी साक्ष देईल. विम्बल्डन २०२६ (Wimbledon 2026) च्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) सामन्यात जोकोविचने कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलियासिमचा (Felix Auger-Aliassime) पराभव करत उपांत्य फेरीत (सेमीफायनल) धडक मारली आहे.
सेंटर कोर्टवर तब्बल ५ तास १५ मिनिटे चाललेला हा सामना विम्बल्डनच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा पुरुषांचा क्वार्टर फायनल सामना ठरला आहे. या थरारक विजयासह जोकोविचने सलग आठव्यांदा विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करत महान रॉजर फेडररचा विक्रम मोडीत काढला आहे.
२२ शॉट्सची ती थकावणारी रॅली अन् सुपर टाई-ब्रेकरचा थरार –
Novak Djokovic is 39 years old and just won a 5 hour and 15 minute match at Wimbledon 😮 pic.twitter.com/ekB1peElnX
— SportsCenter (@SportsCenter) July 7, 2026
५ तासांहून अधिक काळ चाललेल्या या मैदानी युद्धात जोकोविचने २५ वर्षीय कॅनडाच्या खेळाडूचा ७-६(१०), ३-६, ६-३, ६-७(४), ७-६(४) असा पराभव केला. पाचव्या सेटमध्ये जेव्हा सामना ‘सुपर टाई-ब्रेकर’मध्ये पोहोचला, तेव्हा दोघांचाही जीव टांगणीला लागला होता. या टाई-ब्रेकरमध्ये सामन्याचा टर्निंग पॉईंट २२-शॉट्सच्या एका थकावून सोडणाऱ्या रॅलीदरम्यान आला. जोकोविचने फेलिक्सला कोर्टच्या चहूबाजूंना पळवले. प्रचंड थकलेल्या फेलिक्सने अखेर एक फोरहँड शॉट कोर्टच्या बाहेर मारला, ज्यामुळे जोकोविचला ९-४ अशी भक्कम आघाडी मिळाली आणि त्याने विजय आपल्या नावावर केला.
यानिक सिनरविरुद्ध रंगणार हाय-व्होल्टेज सेमीफायनल –
Semifinais da chave masculina de #Wimbledon com os três principais favoritos e um tenista da casa. Quem leva?
– Jannik Sinner 🇮🇹 (1) x Novak Djokovic 🇷🇸 (7)
– Alexander Zverev 🇩🇪 (2) x Arthur Fery 🇬🇧 (WC)Grande surpresa, Arthur Fery é o 1° tenista convidado na semifinal… pic.twitter.com/dCYmlbl3JU
— Pedro Melo 🎙️ (@pedrohmelo_) July 8, 2026
विम्बल्डनमध्ये नवा इतिहास रचणारा जोकोविच आता सेमीफायनलमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या यानिक सिनर (Jannik Sinner) याच्याशी भिडणार आहे. सिनरने जर्मनीच्या जान-लेनार्ड स्ट्रफचा ७-५, ७-६(४), ६-३ असा पराभव करून अंतिम ४ मध्ये जागा मिळवली आहे. गेल्या वर्षी विम्बल्डन सेमीफायनलमध्ये सिनरने जोकोविचला पराभूत केले होते, तर या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचने सिनरला नमवले होते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये आगामी लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.





