ATP Finals : नोवाक जोकोवीचचे आणखी एक विक्रमी विजेतेपद

Novak Djokovic clinches record 7th Paris title – सर्बियाचा जागतिक अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोवीच याने आपल्या कारकीर्दीत आणखी एका विक्रमाची भर घातली. त्याने येथे सुरु असलेल्या एटीपी टेनिस स्पर्धेचे विक्रमी सातवे विजेतेपद पटकावले.
जोकोवीचने या स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत यजमान इटलीच्या जेन्नीक सिन्नर याच्यावर 6-3, 6-3 अशी सरळ दोन सेटमध्ये अवघ्या 1 तास आणि 43 मिनिटात मात केली. यंदाच्या मोसमात जोकोवीचने आपल्या धडाकेबाज कामगिरीत सातत्य राखले व मोसमाची अखेरही एटीपी विजेतेपदासह यशस्वी केली.
Watching Novak Djokovic lift the biggest trophies in tennis never gets old. 7️⃣ 🏆pic.twitter.com/AE7C29Stt2
— Danny 🐊 (@DjokovicFan_) November 19, 2023
नोवाक जोकोवीच याने यंदाच्या मोसमाची सुरुवातही ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकून धडाक्यात केली होती. हे त्याचे 23 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद ठरले.






