Jannik Sinner Anti-Doping Case : नोव्हाक जोकोविचकडून सिनरविषयी आक्षेप, म्हणाला “दोन वेळेस उत्तेजक द्रव्य चाचणी…”

न्यूयॉर्क – मागील आठवड्यामध्ये इटलीच्या जॅनिक सिनरला आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने दोषमुक्त केले केले होते. दोन वेळेस उत्तेजक द्रव्य चाचणीमध्ये दोषी आढळून देखील सिनरचे निलंबन न केल्याबद्दल टेनिस जगतातील अनेक खेळाडूंनी अपेक्ष नोंदविला आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या युएस ओपन टेनिस स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अशा अपेक्षांची नोंद केल्याने, पुन्हा एकदा खेळाच्या बरोबरीने या चर्चाना उधाण आले आहे.
२४ ग्रँड स्लॅम विजेत्या नोव्हाक जोकोविचने या प्रकरणावर आपला आक्षेप नोंदविला आहे. ॲनाबॉलिक स्टिरॉइडची चाचणी करूनही जॅनिक सिनरवर बंदी टाळल्याबद्दल अनेक निराश झाले आहेत. मुळातच या प्रकरणात दोषारोपण झाल्याक्षणी त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षित होते, मात्र ती झाली असल्याचा आक्षेप जोकोविचने नोंदविला आहे.
सिनसिनाटी ओपन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये सिनरने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर लगेचच सिनरला युएस ओपन स्पर्धेसाठी अग्रमानांकित म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस इंटिग्रिटी एजन्सीने सिनर दोषमुक्त असल्याचा निर्वाळा दिला होता. मात्र यावर काही खेळाडूंनी अपेक्ष घेतला होता.
US Open 2024 : कार्लोस अल्काराझ दुखापतग्रस्त, स्पर्धेतील सहभागाबद्दल साशंकता…
यावर बोलताना नोव्हाक जोकोविच म्हणाला, बऱ्याच खेळाडूंची अशी सारखीच प्रकरणे आहेत. मात्र, यांच्याविषयी भूमिका घेताना दुहेरी मापदंड लावण्यात आले आहेत का? असा प्रश्न विचारताना जोकोविचने सर्वच खेळाडूंच्या बाबतीत प्रामाणिक आणि स्पष्ट प्रोटोकॉल यांचा अभाव दिसत असल्याचे निरीक्षण नोंदविले. चाचणी सकारात्मक होऊन देखील त्याला खेळत राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याचे नक्की कारण काय आहे, हे माहिती नाही. त्यामुळे यावर मी फारसा बोलू शकणार नाही. मात्र, आता त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे, असे त्याने बोलताना सांगितले.





