Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा ४८ तासांत पर्दाफाश; ७ जणांना अटक
Samruddhi Mahamarg : घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींचा माग काढत नाशिक ग्रामीण पोलिसांची पथके धाराशिव जिल्ह्यात पोहोचली आणि विविध ठिकाणी कारवाई करत 7 जणांना अटक केली.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर वाहनांना अडवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या सराईत टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे.
या कारवाईत पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातून 7 संशयित आरोपींना अटक केली असून, आणखी पाच आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. (Samruddhi Mahamarg)
२७ ऑगस्ट रोजी वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरील मळढोण शिवारात ही घटना घडली. छत्रपती संभाजीनगर येथील एक कुटुंब मारुती सुझुकी एक्सएल६ कारने मुंबईच्या दिशेने जात असताना आरोपींनी रस्त्यावर लोखंडी वस्तू टाकून वाहन थांबवले. (Samruddhi Mahamarg)
१८ लाख ९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला (Samruddhi Mahamarg)
वाहन थांबताच सुमारे १२ जणांनी कुटुंबीयांना मारहाण करून त्यांच्या जवळील सुमारे १८ लाख ९ हजार ९०० रुपयांचा ऐवज लुटला. यानंतर इतर वाहनांनाही अडवून चालकांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे तपासात समोर आले.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींचा माग काढत नाशिक ग्रामीण पोलिसांची पथके धाराशिव जिल्ह्यात पोहोचली आणि विविध ठिकाणी कारवाई करत 7 जणांना अटक केली. (Samruddhi Mahamarg)
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता समृद्धी महामार्गासह इतर ठिकाणी केलेल्या लूटमार आणि दरोड्यांबाबतही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. या टोळीचे इतर साथीदार तसेच यापूर्वीच्या गुन्ह्यांमधील सहभागाबाबत पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा:





