प्रख्यात गायिका लता मंगेशकर अद्याप आयसीयुतच; ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु
Updated On:

मुंबई – प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांना करोना बाधा झाल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना अद्याप रूग्णालयातील अतिदक्षता विभागातच उपचारासाठी ठेवण्यात आले आहे अशी माहिती रूग्णालयातील सूत्रांनी दिली. 92 वर्षीय लतादिदींना गेल्या आठवड्यात येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लतादिदींच्या निकटवर्तीय रचना शहा यांनी दिदिंची प्रकृती सुधारत असल्याची माहिती गेल्या गुरूवारी दिली होती. प्रसार माध्यमांनी आमच्या कुटुंबांची प्रायव्हसी जपली पाहिजे असे आवाहनही त्यांनी त्यावेळी केले होते. दिदिंवर सध्या ब्रीच कॅन्डी रूग्णलयातील आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना करोना झाल्याचे निदान झाले असले तरी त्याची लक्षणे मात्र सौम्य आहेत.





