नवी दिल्ली – बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. शास्त्री हे आपल्या दिव्य दरबाराद्वारे सर्वसामान्यांच्या अडचणी दूर करण्याचे प्रयत्न करतात. यादरम्यान सुरतमध्ये दिव्य दरबार सुरु असताना बाबाने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामध्ये शास्त्री यांनी पाकसितां सुद्धा हिंदुराष्ट्र होईल असं म्हंटल आहे. ज्याचा व्हिडीओ देखील सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
सुरतमधील दरबारात धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, गुजरातच्या वेड्यांनो,एक गोष्ट तुम्ही आपल्या जीवनात लक्षात ठेवा; आम्ही तुमच्याकडे नाही धन घ्यायला आलो आहोत ना सन्मान घ्यायला आलो आहोत. आम्ही तुम्हाला हनुमान देण्यासाठी आलो आहोत. एक गोष्ट तुम्ही आयुष्यात लक्षत ठेवा ज्या दिवशी गुजरातचे लोक संगठीत होतील त्या दिवशी भारतचं काय आम्ही तर पाकिस्तानला देखील हिंदू राष्ट्र बनवू”
बागेश्वर बाबांनी केलेलं हे विधान चांगलच चर्चेत आलं आहे. बाबांच्या या दरबारात तब्बल 1 लाख लोक उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी प्रमुख स्वामींचा जन्मशताब्दी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गुजरातच्या कानाकोपऱ्यातून सर्वसामान्य लोक या दरबारात हजेरी लावणार असल्याचे समजते.
#WATCH | “…The day people of Gujarat become united like this, not only India but we will also make Pakistan a Hindu nation..,” says Bageshwar Dham’s Dhirendra Shastri in Surat, Gujarat (27.05.2023)
(Video: Bageshwar Dham’s YouTube channel) pic.twitter.com/x9uw9D8anm
— ANI (@ANI) May 29, 2023
बाबा बागेश्वरच्या दिव्य दरबारासाठी 80 फूट लांब आणि 40 फूट रुंद व्यासपीठ बांधण्यात आले आहे. उद्या देखील बाबा बागेश्वरच्या दरबारात 1000 स्वयंसेवक आणि 500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय 500 बाऊन्सरही तैनात करण्यात येणार असल्याचे समजते.