‘गाव नसणं म्हणजे आई-वडील नसण्यासारखं…’ हेमांगी कवीची खास पोस्ट

मुंबई – अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले परखड मत सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसते. रोखठोक मत व्यक्त केल्याने अनेकदा तिच्यावर टीका देखील करण्यात आली होती. नुकतेच हेमांगी सातारा जिल्ह्यातील म्हसवड गावी गेली आहे. तेथील गावच्या घराचा फोटो शेअर करत तिने पोस्ट लिहिली आहे.
हेमांगीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं गावचं घर दिसत आहे. घरासमोर रांगोळी घातलेली आहे. घरच्या साध्या वेशातील गाऊनमधील फोटो हेमांगीने शेअर केला आहे. गावच्या घरासोबत एक फोटो पोस्ट करत हेमांगीने लिहिले की, ”आज जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है!”
पुढे तिने लिहिले की, ”जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत. गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला. मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे!’
View this post on Instagram
या पोस्टसह शेअर केलेल्या फोटोसाठी हेमांगीने टोला लगावत टीप लिहिली आहे, “कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती.” याआधी अनेकदा तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आले आहे. यामुळेच तिने पोस्टमध्ये ही टीप देखील दिली आहे.





