पुणे जिल्हा | सर्वानाच राजकारण नको आहे; आपल्याला पाणी हवं

वाल्हे, (वार्ताहर)- “गुंजवणी धरणाच्या मुख्य बंदिस्त पाइपलाइनचे काम हे मूळच्या खुल्या प्रवाही कालव्याच्या सर्व्हेनुसार, म्हणजेच, वाल्हे (ता. पुरंदर) पश्चिम – उत्तर दिशेने चढाच्याच बाजूने व्हावी; जुन्या कालव्याच्या सर्वेनुसार पाणी आले पाहिजे; गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त पाइपलाइनचे मुळच्या १९९३ च्या मंजूर प्रवाही कालव्याच्या सर्व्हेनुसार वाल्हे,
परिंचे, हरणी, दौंडज, राख या गावांच्या उत्तरेकडील चढाच्या भागातून पाइपलाइन होऊन शेताला पाणी मिळावे; मी शेतकऱ्यांबरोबर आहे; संबंधित अधिकारीवर्गाची बैठक एकत्र लावू, लाभक्षेत्रातील गावातील प्रमुखांसह बैठक लावू; तालुक्यातील सर्व पुढा-यांची एकत्र बैठक घेऊन त्यांचाही पाठींबा घेऊ; आपल्या सर्वानाच राजकारण नको आहे; आपल्याला पाणी हवं आहे”. असे मत आमदार संजय जगताप यांनी व्यक्त केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात गुंजवणी प्रकल्पासंदर्भात अधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये मंगळवार (दि.३०) रोजी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. मात्र, नियोजित बैठकीस, संबंधित विभागाकडील अधिकारी उपस्थित न राहिल्याने, शेतकरीवर्गानी नाराजी व्यक्त केली.
जगताप म्हणाले, गुंजवणी प्रकल्पासंदर्भात पुढील दहा दिवसांत मिटींग लावली नाही तर; आपण सर्वजण सिंचन भवन किंवा मंञालयांच्या गेटवर मिटींग घेऊ, मुख्यमंञी, मंत्री यांना खाली बोलवू; यासाठी आपल्या सगळ्यांना यावे लागेल; यावर उपस्थितांनी होकार दिला.
दरम्यान, काही शेतकरी, तीन-चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत गुंजवणी प्रकल्पासंदर्भातील मिटींगसाठी गेले होते. त्यांना गुंजवणी प्रकल्पातील बंदिस्त पाइपलाइन ही जुन्या १९९३ सर्व्हेनुसार येणार असल्याचे सांगण्यात आल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
दरम्यान, आमदार जगताप म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी, असं मंजूर केले असेल, तर मी लगेचच जाऊन विधानसभेच्या अध्यक्षांना भेटून, माझा हक्कभंग माघे घेतो; माझा किती अपमान करा; मला मान्य आहे; मी मांडलेला गुंजवणी प्रकल्प सोमर्डी व वाल्हे यांना मान्यता द्या विषय संपला.म; आपल्याला, कशासाठी भांडायचंय ?
यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे म्हणाले, “आपण सर्वजण जेव्हा म्हनू, एकच पक्ष गुंजवणी पक्ष, त्यावेळेस योजना होईल; जिरवा- जिरवीच्या भानगडीत पडू नका; आपल्याला पाणी आणायचं; निवडणूकीचे रणांगण वेगळे आहे; त्यामध्ये आपण सगळेच लोकशाही आल्यापासून करतोय; टिका करायची का पाणी आणायचंय ? पाणी आणायचं असेल तर टिका खरोखर करणं गरजेचं आहे का ? टीका करून पाणी आणायचं असेल तर आत्तापर्यंत कधीच आलं असंत; एकमेकांना विश्वासात घेऊन, अडचणी काय आहेत त्या सांगून त्या सोडवू; आपण सर्व एक आहोत; आम्हाला कोणालाही गुंजवणी प्रकल्पासंदर्भात राजकारण करायचं नाही
यावेळी प्रदीप पोमण, गिरीश पवार, सुकलवाडी सरपंच संदेश पवार, वाल्हे माजी सरपंच महादेव चव्हाण, अमोल खवले, बाळासाहेब राऊत, ॲड. फत्तेसिंग पवार, सूर्यकांत पवार, पोपट पवार, सत्यवान सूर्यवंशी, प्रवीण कुमठेकर, राहुल यादव, सागर भुजबळ, मयुर मुळीक, महेंद्र पवार, हनुमंत पवार, मदन भुजबळ, मनोज रणनवरे, संभाजी पवार आदींसह वाल्हे, परिंचे, राख आदी परिसरातील अनेक शेतकरीवर्ग उपस्थित होते. यावेळी, अनेक शेतकरीवर्गानी मनोगत व्यक्त केले. आभार रणसिंग पवार यांनी मानले.
गोंधळातहैी संभ्रम दूर
आमदार संजय जगताप यांच्यासमोरच काही काळ शेतक-यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी, आमदार व स्थानिकांनी पुढाकार घेऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झालेल्या शेतक-यांचे समाधानकारक उत्तरे देऊन संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला.





