“एक्झिट पोल नाही, तर मोदी मीडिया पोल”; राहुल गांधी यांनी स्पष्टच सांगितले

Rahul Gandhi On Exit Polls| लोकसभा निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पार पडल्यनंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. यात एनडीए ला सर्वात जागा मिळणार असून पुन्हा एकदा भाजप सत्तेत येणार असल्याचा अंदाज लावला जात आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हे एक्झिट पोल नसून मोदी मीडिया पोल्स असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुख्यालयात ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, “हे एक्झिट पोल्स केवळ मोदींच्या कल्पना आहेत. प्रसारमाध्यमांवर दाखवले जातायत ते एक्झिट पोल्स नाहीत, ते मोदी मीडिया पोल्स आहेत. तुम्ही सिद्धू मूसेवालाचं २९५ हे गाणं ऐकलंय का? आमच्या इंडिया आघाडीच्या तेवढ्या जागा येतील.” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. Rahul Gandhi On Exit Polls|
ये एग्जिट पोल नहीं है। ये ‘मोदी-मीडिया’ पोल है।
INDIA गठबंधन की 295 सीटें आ रही हैं।
: @RahulGandhi जी pic.twitter.com/alETKjG3SO
— Congress (@INCIndia) June 2, 2024
तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची शनिवारी दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर इंडिया लोकसभेच्या २९५ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र 4 जून रोजीच स्पष्ट होईल. Rahul Gandhi On Exit Polls|
हेही वाचा:
लोकसभेपूर्वी भाजपने ईशान्य भारतात उधळला गुलाल ; अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने मिळवली एकहाती सत्ता





