Norway Chess 2024 : भारतीय ग्रँडमास्टर रमेशबाबू प्रज्ञानंदने ( R. Praggnanandhaa) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला (Magnus Carlsen) प्रथमच क्लासिकल चेसमध्ये पराभूत केलं आहे. या विजयासह त्याने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेतही आघाडी घेतली आहे.
अठरा वर्षीय प्रज्ञानंदने रॅपिड (वेगवान) चेस स्पर्धा किंवा प्रदर्शनी सामन्यांमध्ये कार्लसनचा अनेक वेळा पराभव केला आहे, परंतु क्लासिकल चेसमध्ये कार्लसनवरचा हा त्याचा पहिला विजय होता. त्याने या स्पर्धेत तीन फेऱ्यांनंतर 5.5 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. प्रज्ञानंद पांढऱ्या मोहऱ्यासोबत खेळत होता आणि त्याच्या विजयाने कार्लसनची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
BREAKING NEWS: Praggnanandhaa Defeats Magnus Carlsen for the First Time in Classical Chess!
In an impressive display of skill, Praggnanandhaa defeated World No. 1 Magnus Carlsen with the white pieces in the 3rd round of Norway Chess 2024. Pragg gained an advantage early in the… pic.twitter.com/JHuXIMcX5b
— Manoj Tiwari (@ManojTiwariIND) May 30, 2024
क्लासिकल चेस म्हणजे काय ?
क्लासिकल चेस, ज्याला स्लो चेस देखील म्हणतात, यामध्ये खेळाडूंना आपली चाल करण्यासाठी बराच वेळ देण्यात येतो. खेळाडू चाल करण्यासाठी किमान एक तास तरी घेऊ शकतात. कार्लसन आणि प्रज्ञानंद यांच्यातील या फॉरमॅटमधील मागील तीन सामने अनिर्णित राहिलेले आहेत.
वर्ल्ड चॅम्पियन लिरेनचा झाला पराभव….
याशिवाय जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाने सध्याचा विश्वविजेता चीनच्या डिंग लिरेनचा पराभव केला. या पराभवानंतर लिरेन सहा खेळाडूंच्या या स्पर्धेत तळाला गेला आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत लिरेनचा सामना भारताच्या डी गुकेशशी होईल. याच स्पर्धेत प्रग्नानंदने लिरेनविरुद्ध ड्रॉ खेळला होता.