Norway Chess 2022 : विश्वनाथन आनंदचे दुसरे स्थान कायम
Updated On:

नॉर्वे – भारताचा ग्रॅंडमास्टर विश्वनाथन आनंदने नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या सातव्या फेरीत अझरबैजानच्या तैमूर रदजाबोव्हवर मात केली. या विजयासह आनंदने जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनच्या मागे दुसरे स्थान कायम राखले आहे.
52 वर्षीय भारतीय ग्रॅंडमास्टरचे सातव्या फेरीनंतर 13 गुण असून तो कार्लसनच्या अर्ध्या गुणांनी मागे आहे. कार्लसनला सातव्या फेरीत सडन डेथ टायब्रेकमध्ये नॉर्वेजियन देशबांधव आर्यन तारीने पराभवाचा धक्का दिला. सातव्या फेरीत आनंद आणि रदजाबोव्ह यांचा सामना 42 चालींमध्ये अनिर्णित राहिला. त्यानंतरच्या सडन डेथ टायब्रेकमध्ये आनंदने अझरबैजानच्या खेळाडूला फक्त 25 चालींमध्ये पराभूत केले.




