FIH Hockey 5s rankings : भारतीय पुरुष आणि महिला संघ दुसऱ्या स्थानावर…

FIH Hockey 5s rankings :- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने प्रथमच जाहीर केलेल्या हॉकी अव्वल 5 संघांच्या क्रमवारीत भारतीय पुरुष आणि महिला हॉकी संघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ओमान आणि मलेशियासह भारतीय पुरुष संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे 1400 गुण आहेत.
जानेवारीमध्ये मस्कत येथे झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताने आशियाई चॅम्पियनशिप जिंकली आणि पाचवे स्थान पटकावले होते. तर ओमानने कांस्यपदक जिंकले होते. युरोपियन चॅम्पियनशिप जिंकून नेदरलँड 1750 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पोलंड आणि इजिप्त संयुक्त पाचव्या स्थानावर आहेत.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/ipl-2024-not-only-rishabh-pant-the-whole-world-will-keep-an-eye-on-the-return-of-mitchell-starc-too/
त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि केनिया संयुक्त सातव्या तर पाकिस्तान नवव्या स्थानावर आहेत. तर दुसरीकडे, नेदरलँडने महिलांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर तर पोलंड तिसऱ्या स्थानावर आहे. उरुग्वे आणि दक्षिण आफ्रिका संयुक्त चौथ्या स्थानावर आहेत.


