उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी
Updated On:

प्योंगयोंग : उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मल्टीपल वॉरहेड क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. अनेक अण्वस्त्रे वाहुन नेण्याची क्षमता असलेले हे क्षेपणास्त्र आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याचे जाहीर करतानाच दक्षिण कोरियाने केलेला दावाही उत्तर कोरियाने फेटाळून लावला आहे.
उत्तर कोरियाने कोरियाच्या महाद्विपात पूर्व किनारपट्टीपासून दूर जे क्षेपणास्त्र डागले आहे त्याची चाचणी अयशस्वी होताना दिसते आहे असा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराकडून करण्यात आला होता.
तर एमआयआरव्ही क्षमता सिध्द करण्यासाठी चाचणी घेण्यात आली असल्याचे उत्तर कोरियाने म्हटले होते. एमआयआरव्ही क्षमता म्हणजे एक क्षेपणास्त्र वेगवेगळ्या लक्ष्यांपर्यंत शस्त्रे पोहोचवण्यासाठी सक्षम ठरू शकते.





