North Korea on Iran-Israel War। इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तिसऱ्या महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या दोन देशाच्या युद्धामुळे जग दोन गटात विभागले जात असल्याचे दिसत आहे. याच युद्धायच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर कोरियाने,”इस्रायल हा मध्य पूर्वेतील शांततेसाठी एक कर्करोग आहे आणि जगाची शांतता अन् सुरक्षितता बिघडवणारा मुख्य गुन्हेगार आहे” असे म्हणत गंभीर आरोप केले आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या प्रवक्त्याने इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. इस्रायलने केलेला हल्ला हा मानवतेविरुद्धचा गुन्हा असल्याचे म्हटले. तसेच उत्तर कोरियाने इशारा दिला की यामुळे अस्थिर मध्य पूर्वेमध्ये व्यापक युद्ध होऊ शकते” असा इशारा देखील दिला आहे. कोरियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार, देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने गुरुवारी एक निवेदन जारी केले. यामध्ये त्यांचा देश इस्रायलने इराणच्या नागरिकांवर, अणु आणि ऊर्जा केंद्रांवर केलेल्या लष्करी हल्ल्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त करतो आणि त्याचा तीव्र निषेध करतो” असे म्हटले आहे. यावेळी प्रवक्त्याने पुढे म्हटले कि, इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये नागरिकांची हत्या हा ‘मानवतेविरुद्ध अक्षम्य गुन्हा’ आहे. त्यांनी इस्रायलवर राज्य-पुरस्कृत दहशतवादाचा आरोप केला, ज्यामुळे या प्रदेशात व्यापक युद्धाचा धोका वाढत आहे. उत्तर कोरियाने अमेरिका आणि युरोपीय देशांनाही इशारा North Korea on Iran-Israel War। इराण-इस्रायल युद्धाच्या सुरुवातीपासून, असे मानले जाते की अमेरिका त्याच्या मित्र इस्रायलसह या युद्धात सामील होऊ शकते. एका अमेरिकेच्या वर्तमानपत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी त्यांच्या मित्र राष्ट्रांना सांगितले की त्यांनी इराणवर हल्ला करण्याची योजना मंजूर केली आहे, परंतु इराण आपला अणुकार्यक्रम सोडतो की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी ती सध्या तरी थांबवली आहे. ट्रम्प इराणच्या फोर्डो भूमिगत युरेनियम समृद्धीकरण प्रकल्पावर हल्ला करू शकतात असे मानले जाते. ट्रम्पची इच्छा आहे की इराणने पूर्णपणे आत्मसमर्पण करावे आणि भविष्यात अणुबॉम्ब बनवू नये म्हणून त्यांनी युरेनियम समृद्धीकरण थांबवावे. परंतु इराणने ट्रम्पचा बिनशर्त आत्मसमर्पणाचा प्रस्ताव नाकारला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्पने बुधवारी म्हटले आहे की, ‘मी इराणवर हल्ला करू शकतो, मी करू शकत नाही.’ दरम्यान, उत्तर कोरियाने अमेरिका आणि युरोपीय देशांना या युद्धात हस्तक्षेप करू नये असा इशारा दिला आहे. कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘जगासमोरील सध्याची परिस्थिती हे सिद्ध करते की अमेरिका आणि पाश्चात्य देशांच्या पाठिंब्याने पुढे जाणारा इस्रायल मध्यपूर्वेतील शांततेसाठी कर्करोगासारखा आहे आणि तो जागतिक शांतता आणि सुरक्षितता बिघडवण्याचा मुख्य गुन्हेगार आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय अमेरिका आणि पाश्चात्य शक्तींवर बारीक लक्ष ठेवून आहे. ते युद्धाच्या ज्वाला भडकवत आहेत आणि पीडित इराणच्या कायदेशीर सार्वभौमत्वाच्या आणि स्वसंरक्षणाच्या अधिकाराच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.’असे म्हटले आहे. उत्तर कोरियाची ही टिप्पणी अशा वेळी आली आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी,”इराणच्या बाबतीत त्यांचा संयम संपला आहे. उत्तर कोरियाने अमेरिकेला असे न करण्याचे आवाहन केले आणि इशारा दिला की अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांच्या कृती ‘मध्य पूर्वेतील परिस्थितीला विनाशाकडे नेत आहेत.’ असे म्हटले होते. North Korea on Iran-Israel War।