South Korea vs. North Korea : उत्तर कोरियाच्या सीमेवरून तोफांचा मारा; दक्षिण कोरियाचा दावा

सेऊल :– उत्तर कोरियाच्या सैन्याकडून सीमेवरून आज सुमारे 130 वेळा तोफा डागण्यात आल्या असल्याचा दावा, दक्षिण कोरियाने केला आहे. दक्षिण कोरियाच्या उत्तर आणि पूर्व किनाऱ्याजवळ पाण्यामध्ये या तोफा डागण्यात आल्याचे दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफनी म्हटले आहे.
उत्तर कोरियाच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्याच्या भागातून दुपारनंतर या तोफा डागण्यात आल्या. लष्करी तणाव कमी करण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये दोन्ही कोरियादरम्यान करण्यात आलेल्या बफर झोनमध्ये या तोफांचा मारा करण्यात आला. मात्र तोफांचे गोळे दक्षिण कोरियाच्या सागरी हद्दीमध्ये पडल्याचे कोणतेही वृत्त नाही.
तोफांच्या माऱ्याबद्दल दक्षिण कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी उत्तर कोरियाच्या लष्करी अधिकाऱ्यांना तोंडी समज दिली आहे. तसेच दोन्ही देसांमधील कराराचे पालन करण्याचे आवाहनदेखील केले गेले आहे.
China : वुहानमधील संशोधकाचा खळबळजनक दावा “कोविड-19 विषाणू मानवनिर्मित होता आणि तो…”
दक्षिण कोरियाच्या तोफखान्याचा सराव आजपासून बुधवारपर्यंत चेओरवोन शहराच्या हद्दीमध्ये होणार असल्याने त्याला प्रत्युत्तर म्हणून उत्तर कोरियाकडून हा तोफांचा मारा केला गेल्याचे मानले जाते आहे.





