पक्षातील नेत्यांनाच राहिला नाही काँग्रेसवर विश्वास? सिंघवींच्या विधानाने प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांचाही पक्षावर विश्वास नाही का? असे प्रश्न आता उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी भाजपविरोधी आघाडीबाबत बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुढे केल्यामुळे आज सोशल मीडियावर हे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
बंगालमधील मतदानानंतरच्या हिंसाचाराचे फोटो शेअर करून काही लोकांनी सिंघवी यांना घेरले, तर काही लोकांनी ममताचे कौतुक करण्याचा नवा अर्थ काढला. वास्तविक, सिंघवी हे पश्चिम बंगालचे राज्यसभा खासदार आहेत.
राज्यसभेचा कार्यकाळ दोन वर्षात संपत असल्याची आठवण एका युजरने करून देत सिंघवी राज्यसभेच्या जागेचे नूतनीकरण करण्याची शक्यता पडताळून पाहत आहेत, अस म्हटल आहे.
काँग्रेस नेते सिंघवी यांनी बुधवारी एक ट्विट केले. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाविरोधात विरोधी पक्षांची एकजूट ही काळाची गरज असून त्या एकजुटीच्या ममता बॅनर्जी आधारस्तंभ आहेत. तसेच 2024 साठी राज्यनिहाय, मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रत्येक घटकाला समन्वय साधावा लागेल. भाजपचा सर्वोत्कृष्ट विजयही एकूण मतांच्या 39 टक्क्यांच्या पुढे गेला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली.
Non #BJP opposition is the need of the hour. #Mamta is a pillar of that. Each element has 2unite synergically 2prevent vote division, state by state, for 2024.BJP’s best wins never exceed 39%of popular vote. Mamta &all others have to strain every sinew to unite the non BJP space.
— Abhishek Singhvi (@DrAMSinghvi) March 30, 2022
दरम्यान भाजपविरोधी लोकांना एकत्र करण्यासाठी ममता आणि इतर सर्वांना संयम ठेवावा लागेल, असेही ते म्हणाले.
दुसरीकडे काहींनी 2018 मध्ये काँग्रेसचे उमेदवार सिंघवी यांना ममता बॅनर्जी यांनी राज्यसभेसाठी पाठिंबा दिला होता, याची आठवण करून देत सिंघवी यांच्यावरच टीका केली आहे





