nobel peace prize 2024 : यंदाचा ‘शांततेचा नोबेल’ कोणाला मिळणार? झेलेन्सकी यांच्या नावाची जोरदार चर्चा

Volodymyr Zelenskyy । nobel peace prize 2024 – जगातील सर्वात प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार 2024 साठी संभाव्य उमेदवारांची नावे उघड झाली आहेत. याबाबत तज्ज्ञांनीही आपले भाकीत केले आहे. तसेच सट्टाबाजारासह विविध क्षेत्रांत संभाव्य विजेत्याच्या नावाबाबत कयास लावला जातो आहे.
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार आंतरराष्ट्रीय न्यायालय, संयुक्त राष्ट्र पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी (यूएनआरडब्लूए ) आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यापैकी कोणा एखाद्याला दिला जाऊ शकतो असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने अद्याप कोणत्याही उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत.
दरम्यान, सट्टेबाजारात मात्र रशियातील दिवंगत बंडखोर नेते ॲलेक्सी नवालनी यांच्या नावावर सर्वात मोठा सट्टा लावला गेला आहे. नवालनी यांचा या वर्षी फेब्रुवारीमध्ये तुरुंगात असताना संशयास्पदपणे मृत्यू झाला आहे. त्यांनाच नोबेल शांतता पुरस्कार जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानले जात आहे.
तथापि, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना हा पुरस्कार देता येऊ शकत नसल्यामुळे हा दावाही दुर्लक्षित करण्यासारखा आहे. सट्टा बाजारातच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यावरही सट्टा लावला जातो आहे.
तथापि, त्यांच्या जिंकण्याची शक्यता कमी नाही, कारण झेलेन्स्की यांचा देशच रशियासोबतच्या युध्दात सहभागी असल्यामुळे त्यांनाही हा पुरस्कार दिला जाऊ शकत नाही. नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो.
जो दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दिला जातो. हा पुरस्कार सामान्यतः एकाच श्रेणीतील जास्तीत जास्त तीन लोकांना संयुक्तपणे दिला जातो, तर नोबेल शांतता पुरस्काराच्या बाबतीत हा पुरस्कार कोणत्या संस्थेलाही दिला जाऊ शकतो. याशिवाय हा पुरस्कार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिला जात नाही.
याशिवाय, हा पुरस्कार व्यक्तीच्या मृत्यूनंतर दिला जात नाही. त्याचबरोबर एकदा पुरस्कार दिला की तो परत घेता येत नाही. नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर मिळतात. भारतीय रुपयात ही 8 कोटींपेक्षा जास्त असते. विजेत्यांना पैशांसोबतच प्रमाणपत्र आणि सुवर्णपदकही दिले जाते.





