अपयशात कोणाची मदत नसते – रवीचंद्रन अश्विन
Updated On:

जोहान्सबर्ग – एक खेळाडू म्हणून जेव्हा अपयश येत असते तेव्हा तुम्हाला कोणी पाठिंबा देण्यासाठी पुढे येत नाही. जेव्हा मला अपयश येत होते तेव्हा मी हा वारंवार अनुभव घेतला. त्यामुळे एक क्षण मला निवृत्तीचा विचारही मनात आला होता, असा खुलासा भारताचा ऑफ स्पिन गोलंदाज रवीचंद्रन अश्विन याने केला आहे.
अश्विन म्हणाला, 2018 मध्ये निवृत्ती घेण्याचा विचार मनात येत होता. अपयशाच्या या काळात सुमार क्षणांचा अनुभव येत होता. त्यावेळी माझ्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही.
त्या काळात मानसिकता इतकी खालावली होती की सहा चेंडू टाकल्यावरही थकवा जाणवायचा आणि आता विश्रांतीची गरज आहे असे वाटायचे, असेही त्याने सांगितले.





