‘रक्ताची नाती कोणी बदलू शकत नाही’; प्रतीक पाटीलच्या सावत्र बहिणीची भावूक पोस्ट

Smita Patil Son Pratik | ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांची मुलगी जुही बब्बरने रक्षाबंधननिमित्त काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरवर्षी जुही सावत्र भाऊ प्रतीक बब्बरला राखी बांधते, पण यंदाच्या रक्षाबंधनला प्रतीक बब्बर कुटुंबाबरोबर नसल्याने तिने दुःख व्यक्त केले आहे.
जुहीने भाऊ आर्य बब्बर व कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यात ती भाऊ आर्यला राखी बांधताना दिसत आहे. तसेच कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्याबरोबर दिसतात. पण या फोटोंमध्ये प्रतीक बब्बर नव्हता. यावेळी जुहीने लिहिलेल्या भावनिक कॅप्शनने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जुहीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काही सेलिब्रेशन पूर्ण असतात, तर काही अधुरी वाटतात. आज रक्षाबंधन आहे आणि मनात आनंद तर आहे, पण माझ्या हृदयाचा एक भाग अजूनही गायब आहे. पण आयुष्य पुढे जातच असतं आणि रक्ताची नाती कोणी बदलू शकत नाही, ’ असं तिने पोस्टसोबत लिहीलं. Smita Patil Son Pratik |
View this post on Instagram
लग्नाचं निमंत्रण बब्बर कुटुंबाला नाही
प्रतीकने काही महिन्यांपूर्वीच १४ फेब्रुवारी २०२४ रोजी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी दुसरं लग्न केलं. पण या लग्नाचं निमंत्रण त्याने बब्बर कुटुंबाला दिलं नव्हतं. वडील राज बब्बर यांनाही लग्नाला बोलावलं नव्हतं. आता तो रक्षाबंधननिमित्त देखील त्यांच्यासोबत सामील झाला नाही. इतकेच काय तर प्रतीक बब्बरने या वर्षाच्या सुरुवातीला त्याचं नाव अधिकृतपणे बदलून प्रतीक स्मिता पाटील असं केलं आहे. Smita Patil Son Pratik |
प्रतीक हा राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. स्मिता यांच्याआधी राज यांचे लग्न नादिरा बब्बरशी झाले होते, त्यांच्यापासून त्यांना जुही आणि आर्या ही दोन मुले आहेत. प्रतीक त्याच्या सावत्र भावंडांसह एकत्र राहत होता, पण एप्रिल 2025 पासून ते वेगळे झाले आहेत. Smita Patil Son Pratik |
हेही वाचा :





