Mohsin Naqvi : ‘आम्ही आता चर्चेसाठी भीक मागणार नाही…’, IND vs PAK सामन्यापूर्वी पीसीबीच्या अध्यक्षाचं वक्तव्य

बऱ्याच काळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका पाहायला मिळालेली नाही. दोन्ही संघ केवळ आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) अनेकदा भारतासोबत मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हा प्रस्ताव नेहमीच नाकारला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून या सामन्यांमुळे मोठा फायदा होऊ शकतो, तरीही बीसीसीआय आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
पीसीबीच्या अध्यक्षाची बीसीसीआयला चेतावणी –
“No more begging India, that time has passed”: PCB chief Mohsin Naqvi makes bold claim ahead of India vs Pakistan Asia Cup 2025 clash
— IndiaWarMonitor (@IndiaWarMonitor) August 24, 2025
द्विपक्षीय मालिकांप्रमाणेच टूर्नामेंटमधील भारत-पाकिस्तान सामन्यांबाबतही अडचणी कायम आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिला होता. आता पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी बीसीसीआयला कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले. लाहोर येथील पत्रकार परिषदेत नक्वी म्हणाले, “आमची भूमिका स्पष्ट आहे. भारताशी कोणतीही चर्चा समान पातळीवर होईल. आम्ही आता चर्चेसाठी भीक मागणार नाही. तो काळ संपला आहे. आता सर्व काही समानतेच्या आधारावर होईल.”
हेही वाचा – Asia Cup 2025 : श्रेयस अय्यर आशिया कप खेळणार? ACCचा ‘हा’ नियम बदलू शकतो भारतीय फलंदाजाचं नशीब
भारत सरकारचा द्विपक्षीय मालिकेला नकार –
“In so far as bilateral sports events in each other’s country are concerned, Indian teams will not be participating in competitions in Pakistan. Nor will we permit Pakistani teams to play in India”: Ministry of Youth and Affairs, Govt of India pic.twitter.com/s1P0b1AbTT
— ANI (@ANI) August 21, 2025
भारतीय सरकारने अलीकडेच स्पष्ट केले आहे की, भविष्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणतीही द्विपक्षीय क्रिकेट मालिका होणार नाही. दोन्ही संघ फक्त बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतील. दोन्ही देशांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये झाली होती. अलीकडील काळात भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याने मालिका आयोजित करण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही.





