काहीही झाले तरी हमास विरुद्धचे युद्ध थांबणार नाही – इस्रायल पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू

तेल अविव, (इस्रायल), – काहीही झाले तरी हमास विरुद्धचे युद्ध थांबणार नाही असे इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये या युद्धबंदीविषयक ठराव करण्यात आला असल्याच्या पार्श्वभुमीवर त्यांनी ही प्रतिक्रीया दिली आहे. जरी आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला मदत केली किंवा मदत केली नाही, तरी हमास विरुद्धचे इस्रायलचे युद्ध थांबणार नाही, असे त्यांनी ठामपणे म्हटले आहे.
हमासने केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धाचा आता तिसरा महिना सुरू झाला आहे. हमासच्या हल्ल्यात १,२०० इस्रायली मारले गेले. तर इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये तब्बल १८ हजारांपेक्षा जेस्त पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून इस्रायलवर युद्धबंदीसाठी आणि गाझामधील मानवतावादी मदतीसाठी मोठा दबाव येऊ लागला आहे. तरीही आपली भूमिका ठाम असल्याचे नेतान्याहू यांनी या प्रतिक्रीयेतून स्पष्ट केले आहे.





