हरियाणात ‘काँग्रेस – आप’ युती फिस्कटली!

चंदीगड – काँग्रेससोबत आघाडीची चर्चा सुरू असताना आज आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर आप हरियाणा प्रदेशाध्यक्ष सुशील गुप्ता यांनी युतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
आज 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून लवकरच आम्ही दुसरी यादी देखील प्रसिद्ध करू असे त्यांनी सांगितले. युतीच्या चर्चेला पूर्णविराम देताना ते म्हणाले की आम्ही ‘इंडिया’च्या आघाडीचे भागीदार आहोत पण राष्ट्रीय पातळीवर आहोत. आता निवडणुकीसाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. आम्ही काॅंग्रेससोबतच्या युतीसाठी प्रामाणिकपणे वाट पाहिली.
हरियाणा विधानसभेसाठी आपची 20 उमेदवारांची पहिली यादी –
📢Announcement 📢
The Party hereby announces the following candidates for the state elections for Haryana Assembly.
Congratulations to all 💐 pic.twitter.com/Ulca3eVppu
— AAP (@AamAadmiParty) September 9, 2024
यामुळे युती तुटली –
हरियाणा विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. आप आणि काँग्रेस यांच्यातील चर्चा अयशस्वी झाली कारण आम आदमी पार्टी 10 पेक्षा जास्त जागांची मागणी होती आणि काँग्रेस 3 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नव्हते. दरम्यान, काँग्रेसचे काही नेतेही या आघाडीविरोधात सल्ला देत होते.
निवडणुका कधी होणार ?
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर आहे. त्याच वेळी, राज्यात एकाच टप्प्यात म्हणजे 5 ऑक्टोबर रोजी निवडणुका होतील आणि 8 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरसोबत मतमोजणी होईल.





